
खडकवासला : खडकवासला धरणाच्या उत्तरेकडील व राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनी (एनडीए)च्या पाठीमागील मांडवी, कुडजे, आगळंब्यासह १० ते १५ गावांमध्ये गेल्या सहा महिन्यांत चोऱ्या व घरफोड्यांच्या घटना घडल्या आहेत. सध्या चोरट्यांचा धुमाकूळ सुरू असल्याने येथील नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण आहे.