
मनिला येथे ‘दक्षिण-पूर्व आशियात अवैध व्यापाराशी लढा: धोक्याचा सामना करण्यासाठी सीमापार आणि क्षेत्रीय धोरणे’ या विषयावर नुकत्याच पार पडलेल्या शिखर परिषदेत दक्षिण-पूर्व आशियातील तज्ज्ञांनी तंबाखूच्या वाढत्या बेकायदेशीर व्यापाराच्या वाढत्या धोक्याकडे लक्ष वेधले. ही एक अशी समस्या आहे, जी भारत आणि दक्षिण-पूर्व आशियातील सार्वजनिक आरोग्य प्रणालीस आतून पोखरत आहे आणि सरकारी उत्पन्नाचा ऱ्हास करत आहे.