पुणे जिल्ह्यातील या तालुक्यांत वाढला कोरोनाचा धोका 

corona
corona

पुणे :  पुणे जिल्ह्यातील ग्रामीण भागात कोरोनाचा धोका दिवसेंदिवस वाढतच चालला आहे. कोरोनाबाधितांची संख्या आजही मोठ्या प्रमाणात वाढली. त्यात कोरोनाने मृत्यू झालेल्यांचा आकडाही वाढला आहे. 

खेडमध्ये ६४ कोरोनाबधितांची वाढ
राजगुरूनगर :
 खेड तालुक्याने कोरोनाबधितांचा दोन हजारांचा टप्पा ओलांडला आहे. गेल्या चोवीस तासात ६४ कोरोनाबधित रुग्णांची वाढ झाली असून, रूग्ण संख्या २०१० झाली आहे. तसेच निघोजे येथील एका ८८ वर्षाच्या वृद्धाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे, अशी माहिती तालुका आरोग्य अधिकारी डॉ. बी. बी. गाढवे यांनी दिली. आज चाकणला ९, आळंदी येथे ९ आणि राजगुरूनगरला १० कोरोनाबधित रूग्ण आढळले. तालुक्याच्या ग्रामीण भागात ३६ रुग्ण सापडले. सावरदरीला ६, सोळू येथे ५, कोयाळीला ५, निघोजे येथे ४, मोईला ४, चऱ्होली येथे ३ आणि वाकी खुर्द येथे २ रूग्ण आढळले. तर वडगाव पाटोळे, चांडोली, कडूस, सिद्धेगव्हाण, केळगाव, पूर आणि वाडा या गावांमध्ये प्रत्येकी एक रुग्ण आढळून आला.

शिरूरमध्ये 31 नवीन रुग्ण  
शिरूर :
शिरूर शहर व तालुक्‍याच्या विविध भागातील 31 जणांचा कोरोना रिपोर्ट शुक्रवारी पॉझिटिव्ह आला. यातील दहाजण ज्येष्ठ नागरिक असले; तरी धक्कादायक बाब म्हणजे आठ बाधित हे आठ ते 15 वर्षे वयोगटातील मुले आहेत. त्यातच शहरातील एक व तालुक्‍यातील दोघांचा असे तिघांचे मृत्यू झाल्याने तालुक्‍याला पुन्हा हादरा बसला आहे. सर्वाधिक सात रुग्ण शिक्रापूर येथे आढळले असून, त्याखालोखाल शिरूर शहरातील पाच जणांचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला. कोरेगाव भीमा व सणसवाडी येथील प्रत्येकी तिघांना बाधा झाली असून, शिरूर ग्रामीण, डिंग्रजवाडी व तळेगाव ढमढेरे येथील प्रत्येकी दोघांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. कोंढापुरी, पारोडी, धानोरे, टाकळी भीमा, दरेकरवाडी, वढू बुद्रूक, जातेगाव बुद्रुक व मांडवगण फराटा येथील प्रत्येकी एकाचा रिपोर्ट पॉझिटिव्ह आला.  

पुरंदरमध्ये एकाचा मृत्यू
सासवड :
पुरंदर तालुक्यातील कोथळे  गावातील 70 वर्षीय एक ज्येष्ठाचा आज कोरोनाबाधीत स्थितीत मृत्यू झाला. त्यातून कोरोना बळींचा पुरंदर तालुक्याचा आकडा आज 28 वर गेला. आज दिवसभरात तालुक्यात कोरोना पाॅझिटिव्ह रुग्ण सहा आढळले. त्यातून थोडा दिलासा मिळाला आहे. पुरंदर तालुक्यातील कोरोनाबाधीत संख्या आजअखेर 687 व सासवड शहरातील रुग्ण संख्या 305 वर पोचली. 

मुळशीत रुग्णांची संख्या 853  
पिरंगुट :
मुळशी तालुक्‍यातील कोरोनाबाधितांची संख्या 853 झाली आहे. आज तालुक्‍यात नवीन 13 रुग्ण आढळून आले. मारुंजी येथे दोन, हिंजवडी एक, नेरे दोन, भरे एक, अकोले एक , उरावडे एक, भूगाव एक, पिरंगुट दोन, भुकूम एक आणि लवळे येथील एक रुग्णाचा यात समावेश आहे. तालुक्‍यात दिवसभरात सात जण कोरोनामुक्त झाले असून, बरे झालेल्या रुग्णांची संख्या आता 668 झाली आहे. कोरोनामुळे दोन रुग्णांचा मृत्यू झाला. त्यामुळे मृतांची एकूण संख्या 26 झाली आहे. तालुक्‍यात सध्या 159 रुग्णांवर उपचार सुरू आहेत. त्यापैकी एक रुग्ण अत्यवस्थेत असून पाच जणांवर अतिदक्षता विभागात उपचार सुरू आहेत. 

आंबेगाव तालुक्यात आणखी सात पॉझिटिव्ह
मंचर :
आंबेगाव तालुक्यात शुक्रवारी (ता. 14) सात कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले, अशी माहिती आंबेगाव तालुक्याचे आरोग्य अधिकारी डॉ सुरेश ढेकळे यांनी दिली. कळंब पाच, मंचर व गंगापूर बुद्रुक येथे प्रत्येकी एक पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आले आहेत. तालुक्यातील एकूण पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 490 झाली आहे.  

जुन्नरमध्ये एकाचा मृत्यू
जुन्नर :
ठिकेकरवाडी (ता. जुन्नर) येथील 62 वर्षीय पुरुषाचा कोरोना संसर्गाने आज उपचार सुरू असताना मृत्यू झाला. त्यामुळे तालुक्यातील मृतांची संख्या 26 झाली आहे. नळवणे व सुसरबाग-आगर येथे प्रत्येकी एक, अशा फक्त दोन नवीन रुग्णांची आज शुक्रवारी वाढ झाली. त्यामुळे एकूण रुग्ण संख्या 560 झाली आहे. यापैकी 453 बरे झाले असून, 81 विविध रुग्णालयात उपचार घेत आहेत. 

शिरूरमध्ये 31 जणांना बाधा
शिरूर :
शिरूर शहर व तालुक्याच्या विविध भागातील ३१ जणांचा कोरोना रिपोर्ट आज पॉझिटीव्ह आला. यातील दहाजण ज्येष्ठ नागरीक असले; तरी धक्कादायक बाब म्हणजे आठ बाधित हे आठ ते १५ वर्षे वयोगटातील मुले आहेत. त्यातच शहरातील एक व तालुक्यातील दोघांचा असे तिघांचे मृत्यू झाले. आज सर्वाधिक सात रूग्ण शिक्रापूर येथे आढळले असून, त्याखालोखाल शिरूर शहरातील पाच जणांचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. कोरेगाव भीमा व सणसवाडी येथील प्रत्येकी तिघांना बाधा झाली असून, शिरूर ग्रामीण, डिंग्रजवाडी व तळेगाव ढमढेरे येथील प्रत्येकी दोघांना कोरोनाचा संसर्ग झाला आहे. कोंढापूरी, पारोडी, धानोरे, टाकळी भीमा, दरेकरवाडी, वढू बुद्रूक, जातेगाव बुद्रूक व मांडवगण फराटा येथील प्रत्येकी एकाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला. शहरातील एक व विठ्ठलवाडी येथील एकाचा मृत्यू झाला असून, हे दोघेही ज्येष्ठ नागरिक आहे. मात्र, सणसवाडी येथील ३२ वर्षीय कंपनी कामगाराचा मृत्यु झाला आहे. तालुक्यात आजअखेर कोरोना रूग्णांची संख्या ८१७ झाली असून, त्यातील १५२ रूग्ण शिरूर शहरातील आहेत. कोरोनातून बरे होणारांचे प्रमाण पन्नास टक्केच्या आसपास असले; तरी मृतांची सरासरी टक्केवारी जिल्ह्यातील इतर तालुक्यांच्या तूलनेत सर्वाधिक आहे. तालुक्यात आत्तापर्यंत ३१ जणांना कोरोनामुळे मृत्यु झाला असून, त्यातील पाचजण शिरूर शहरातील आहेत. शिरूर शहरातील सुंदरसृष्टीमधील १४ वर्षीय, हुडको वसाहतीतील (संभाजीनगर) १३ वर्षीय मुलांनाही कोरोनाची बाधा झाली असून, जोशी वाडी येथील ३२ वर्षीय पुरूष, सैनिक सोसायटीतील चाळीस वर्षीय पुरूष आणि रेव्हेन्यू कॉलनी येथील चाळीस वर्षीय पुरूषाचा रिपोर्ट पॉझिटीव्ह आला आहे.

दौंडमध्ये दोन जणांना बाधा
दौंड :
दौंड शहरात एक पोलिस व एका महिलेसह एकूण दोन जणांना कोरोना विषाणूची बाधा झाली आहे. शहरातील १३४ कोरोना संशयित नागरिकांचे घशातील स्त्राव तपासणीसाठी (स्वॅब टेस्ट) पुणे येथे पाठविण्यात आले होते. १४ ऑगस्ट रोजी आलेल्या अहवालानुसार त्यापैकी तब्बल १३२ जणांचा वैद्यकीय अहवाल नकारात्मक आल्याने मोठा दिलासा मिळाला आहे. दौंड शहरातील राज्य राखीव पोलिस दल (एसआरपीएफ) गट क्रमांक सात मधील एक पोलिस आणि कस्तान चाळ मधील एक महिला यांना कोरोनाची बाधा झाली आहे, अशी माहिती उप जिल्हा रूग्णालय अधीक्षक डॅा. संग्राम डांगे यांनी दिली.

बारामतीत कोरोनाचे आणखी 18 रुग्ण 
बारामती :
बारामती शहरातील कोरोनाच्या रुग्णांचा आकडा झपाट्याने वाढत असून, एकाच कुटुंबातील अनेक सदस्यांना बाधा होण्याचे प्रमाणही वेगाने वाढू लागले आहे. आज सकाळी उपलब्ध झालेल्या माहितीनुसार, एकाच दिवसात 18 जणांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आले आहेत. बारामतीच्या रुग्णसंख्येचा आकडा आता सव्वातीनशेच्या पलिकडे म्हणजेच 326 इतका झाला आहे. त्यातील 167 रुग्ण उपचार घेत असून 138 रुग्ण बरे झाले आहेत, 21 जणांचा मृत्यू झाला आहे 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com