विद्यार्थ्यांना घरपोच मिळणार शालेय पोषण आहाराचे साहित्य; येत्या दोन आठवड्यात वाटप

सकाळ वृत्तसेवा
Friday, 14 August 2020

शालेय विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टीतील ३४ दिवसांचे शालेय पोषण आहाराचे साहित्य विद्यार्थ्यांना घरपोच देण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. यामुळे शालेय विद्यार्थ्यांना आता १ मे ते १५ जून या कालावधीतील पोषण आहार आता शिलबंद पाकिटाद्वारे घरपोच मिळणार आहे. येत्या दोन आठवड्यात याचे प्रत्यक्ष वाटप केले जाणार आहे.

पुणे - शालेय विद्यार्थ्यांना उन्हाळी सुट्टीतील ३४ दिवसांचे शालेय पोषण आहाराचे साहित्य विद्यार्थ्यांना घरपोच देण्यास राज्य सरकारने मंजुरी दिली आहे. यामुळे शालेय विद्यार्थ्यांना आता १ मे ते १५ जून या कालावधीतील पोषण आहार आता शिलबंद पाकिटाद्वारे घरपोच मिळणार आहे. येत्या दोन आठवड्यात याचे प्रत्यक्ष वाटप केले जाणार आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

- पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

दरम्यान, १५ जूनपासून नवीन शैक्षणिक वर्ष सुरू झाले आहे. मात्र या चालू शैक्षणिक वर्षांतील शालेय पोषण आहाराबाबत राज्य सरकारकडून अद्यापही काहीच मार्गदर्शक सूचना आलेल्या नाहीत. त्यामुळे चालू शैक्षणिक वर्षांतील या आहार वाटपाबाबतचा संभ्रम अद्यापही कायम आहे.

तरुण-तरुणींनो, मोबाईलमध्ये ऍप डाऊनलोड करताय? तर 'जोकर'पासून राहा सावध

कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर यापुढे पोषण आहाराचे साहित्य शिलबंद पाकिटाद्वारे घरपोच दिले जाणार आहे.आतापर्यंत सरकारने याबाबत निश्चित करून दिलेल्या प्रमाणानुसार शाळेतच वजन करून प्रत्येक विद्यार्थ्यांला हे साहित्य देण्यात येत असे. परंतू विद्यार्थीनिहाय शिलबंद पाकिटे देण्यामुळे आता  वजन करण्याचे शिक्षकांचे काम वाचू शकणार आहे.

ज्येष्ठ नागरिक आणि दिव्यांगांना पीएमपीचा ठेंगा; वाचा काय आहे हे प्रकरण

कोरोनामुळे १६ मार्चपासून शाळा बंद करण्यात आल्या आहेत. यामुळे शाळांमध्ये शिल्लक असलेल्या शालेय पोषण आहाराच्या साहित्याचे काय करायचे, हा प्रश्र्न शाळांसमोर निर्माण झाला होता. पण जिल्हा परिषदेच्या प्रयत्नानंतर हे साहित्य विद्यार्थ्यांना घरपोच देण्यास सरकारने परवानगी दिली होती. यामुळे मे महिन्यात मार्च आणि एप्रिल या दोन महिन्यांचा पोषण आहार विद्यार्थ्यांना घरपोच देण्यात आला होता. 

रात्रभर पाऊस; खडकवासला धरणाचे एक फुटाने उघडले सहा दरवाजे

दरम्यान, कोरोनामुळे ग्रामीण भागातील पालक आणि विद्यार्थी आर्थिकदृष्ट्या अडचणीत आले आहेत. त्यामुळे यावर्षी विशेष बाब म्हणून उन्हाळी सुट्टीतही शालेय पोषण आहार उपलब्ध करून देण्याची मागणी पुणे जिल्हा परिषदेने केली होती.

यानुसार इयत्ता पहिली ते पाचवीच्या विद्यार्थ्यांना प्रति विद्यार्थी ६०० ग्राम मूगदाळ, १ किलो २०० ग्राम हरभरा, तीन किलो ४०० ग्राम तांदूळ तर, सहावी ते आठवीच्या विद्यार्थ्यांना अनुक्रमे ९०० ग्राम मूगदाळ, १ किलो ८०० ग्राम हरभरा आणि पाच किलो १०० ग्राम तांदूळ घरपोच दिला जाणार आहे. 

काय सांगता? बायकांना लागले तंबाखूचे डोहाळे; टक्केवारी धक्कादायक!

शालेय पोषण आहार संक्षिप्त माहिती
- पहिली ते पाचवीचे एकूण विद्यार्थी ---- ४ लाख ४९ हजार ८२७.
- सहावी ते आठवीची विद्यार्थी संख्या --- २ लाख ९७ हजार ९३९.
- वाटप केला जाणारा एकूण तांदूळ --- ३० टन ३० क्विंटल १४८ किलो.
- वाटप हरभरा --- १० टन ७६ क्विंटल, ८२ किलो.
- वाटपासाठीची मूगदाळ ---- ५ टन ३८ क्विंटल, ४१ किलो.

चालू शैक्षणिक वर्षांतील शालेय पोषण आहाराबाबत जिल्हा परिषदेला राज्य सरकारकडून अद्याप काहीही सूचना प्राप्त झालेल्या नाहीत. परंतू चालू शैक्षणिक वर्षांत पोषण आहार पुरवठा केला जाणार असल्याचे सांगण्यात आले आहे.
- रणजित शिवतरे, शिक्षण सभापती व उपाध्यक्ष जिल्हा परिषद, पुणे.

विद्यार्थी, पालक प्रतिक्रिया
कोरोनामुळे ग्रामीण भागातील आर्थिक स्थिती बिघडली आहे. यामुळे विद्यार्थ्यांना नियमितपणे शालेय पोषण आहार मिळाला पाहिजे. त्यात खंड पडता कामा नये.
- बाळासाहेब वरे (कानसे) पालक.

शाळेतून मिळणाऱ्या या आहारामुळे शिक्षण घेण्याची गोडी निर्माण होत आहे. आमच्या भागातील काही विद्यार्थी केवळ आहाराच्या आशेने शिक्षण घेत आहेत. 
- श्रीराम विजय गभाले (विद्यार्थी), जिल्हा परिषद शाळा, नंदकरवाडी (फुलवडे) ता. आंबेगाव.

Edited By - Prashant Patil


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Students will receive home school food supplies Allocated in the next two weeks