
विश्रांतवाडी : येरवडा (yerwada) येथील लक्ष्मीनगरमधील संभाजी महाराज चौक येथे नवचैतन्य मित्र मंडळाच्याजवळ असलेल्या दगडी टेकडीचा काही भाग कोसळण्याचा धोका निर्माण झाला आहे. येथे असलेल्या लिंबाच्या झाडाच्या वाढत्या मुळांमुळे टेकडीचे छोट्यामोठ्या खडकांमध्ये विभागलेले असून कोणत्याही क्षणी दरड कोसळून टेकडी खाली राहणाऱ्या नागरिकांची मोठी जीवितहानी होऊ शकते. (Risk of collapse hill due growing roots of the tree)
येरवडा परिसरात यापूर्वी ५ झाडे पडल्यामुळे नागरिकांचे नुकसान झाले होते. याबाबत वृक्ष प्राधिकरण विभागाला पूर्वकल्पना देऊन देखील त्यांनी कानाडोळा केल्याने दुर्घटना घडली होती, आता असे होऊ नये. आम्हाला जीव मुठीत घेऊन रहावे लागते, असे स्थानिक नागरिक शंकर अगलदिवटे यांनी सांगितले.
यासंदर्भात सामाजिक कार्यकर्ते मनोज शेट्टी म्हणाले की, या टेकडीबाबतीत अशी दुर्घटना होऊ नये म्हणजे येरवडा कळस धानोरी क्षेत्रिय कार्यालयाचे सहायक आयुक्त वैभव कडलक यांना फोन करून गंभीर परिस्थितीची पूर्व कल्पना देण्यात आली आहे. परिस्थितीची गंभीर दखल घेत त्यांनी तातडीने संबंधित अधिकार्यांना जागेची पाहणी करण्यास पाठवले आहे. पुढील कार्यवाही त्वरित करून टेकडीचा धोकादायक भाग काढून टाकण्यात यावा अशी मागणी मनोज शेट्टी यांनी केली आहे.
सकाळ+ चे सदस्य व्हा
ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!
शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.
Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.