esakal | पाणी पुरवठा निविदेतील ‘जादू’ची महापालिका वर्तुळात चर्चा
sakal

बोलून बातमी शोधा

Pune Municipal Corporation

पाणी पुरवठा निविदेतील ‘जादू’ची महापालिका वर्तुळात चर्चा

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : जलशुद्धीकरण केंद्रातील विविध कामांसाठी काढण्यात आलेल्या ३८ कोटी रुपयांच्या तीन निविदांतील अनेक गमती-जमती समोर आल्या आहेत. वारजे (warje) जलशुद्धीकरण केंद्रातील देखभाल दुरुस्तीचा खर्च अचानक चार कोटी रुपयांनी वाढला आहे. खडकवासला (khadakwasla) रॉ वॉटर पंपिंग स्टेशनमधील त्याच कामाचा खर्च तीन वर्षानंतर आठ लाख रुपयांनी कमी झाला आहे. ही ‘जादू’कशी झाली, हा महापालिका (pune corporation) वर्तुळात चर्चेचा विषय झाला आहे. (Discussion of magic in water supply tenders pune coporation)

महापालिकेने खडकवासला रॉ वॉटर पंपिग स्टेशन, वारजे आणि वडगाव येथील जलशुद्धीकरण प्रकल्पातील विविध कामांसाठीच्या सुमारे ३८ कोटी रुपये किमतीच्या निविदा काढल्या आहेत. त्यात पाणी पुरवठा विभागातील अधिकाऱ्यांनी विशिष्ट ठेकेदाराच्या हितासाठी काय काय गमती-जमती केल्या आहेत, यांची कागदपत्रे ‘सकाळ’च्या हाती आली आहेत.

हेही वाचा: पाचवी, आठवीची शिष्यवृत्ती परीक्षा आता ८ ऑगस्टला

वारजे येथील जलशुद्धीकरण केंद्र टप्पा १ व २ येथील देखभाल दुरुस्तीच्या कामाची निविदा तीन वर्षांपूर्वी महापालिकेने काढली. त्यामध्ये कामगारांच्या वेतनापोटी ७ कोटी १९ लाख रुपये, तर देखभाल दुरुस्तीसाठी ६ कोटी ८ लाख रुपये असा एकूण १३ कोटी २७ लाख रुपयांची निविदा काढली. प्रकल्पातील याच कामासाठी काढलेल्या निविदेत कामगारांच्या वेतनापोटी ७ कोटी ७१ लाख रुपये, तर देखभाल दुरुस्तीसाठी १० कोटी १ लाख रुपये खर्च असे मिळून १७ कोटी ७२ लाख रुपयांची निविदा काढली. वास्तविक तीन वर्षांपूर्वी देखभाल दुरुस्तीचे काम ६ कोटी रुपयांमध्ये होत होते. तीन वर्षात त्यामध्ये ४ कोटी रुपयांनी एकदम कशी वाढ झाली, असा प्रश्‍न अनेकांना पडला आहे.

खडकवासला रॉ वॉटर पंपिंग स्टेशनमधील विविध कामांसाठी तीन वर्षांपूर्वी काढलेल्या निविदेत कामगारांच्या वेतनापोटी ५ कोटी २९ लाख आणि देखभाल दुरुस्तीसाठी ३ कोटी ६ लाख रुपये असे एकूण मिळून ८ कोटी ३५ लाख रुपयांची निविदा काढली होती. आता काढण्यात आलेल्या निविदेत कामगारांच्या वेतनापोटी ६ कोटी ४२ लाख, तर देखभाल-दुरुस्तीसाठी २ कोटी ९८ लाख अशी ९ कोटी ४१ लाख रुपयांची निविदा काढली. यावरून या रॅा वॉटर पंपिग स्टेशनमधील देखभाल दुरुस्तीच्या कामाचा खर्च तीन वर्षानंतर ८ लाख रुपयांनी कमी कसा झाला, अशी शंका उपस्थित झाली आहे.

हेही वाचा: पुणे : 'पीएमआरडीए’त शिवसेनेचा वरचष्मा

वारजे जलशुद्धीकरण केंद्राची निविदा काढताना टप्पा- १ व २ असे धरून काढली आहे. जुना व नवा असे मिळून जलशुद्धीकरण केंद्रांची क्षमता ३०० एमएलडी एवढी आहे. त्यामुळे खर्चात वाढ झाली, असे भासवण्याचा प्रयत्न प्रशासनाकडून करण्यात आला आहे. वास्तविक तीन वर्षांपूर्वी काढण्यात आलेली निविदा देखील टप्पा १ व २ अशी धरूनच काढली होती आणि केंद्रांची क्षमताही तेवढीच आहे. या उलट तीन वर्षांपूवी खडकवासला रॉ वॉटर पंपिग स्टेशनमध्ये पाषाण पंपिंग स्टेशनचा समावेश नव्हता. आता काढण्यात आलेल्या निविदेत खडकवासला बरोबरच पाषाण पंपिंग स्टेशनचा समावेश करून देखील देखभाल दुरुस्तीचा खर्च कमी झाला असल्याचे समोर आले आहे.

एवढा खर्च कसा काय?

वडगाव जलशुद्धीकरण केंद्र २५० एमएलडी क्षमतेचे आहे. या केंद्राच्या देखभाल-दुरुस्तीसाठी काढण्यात आलेल्या निविदेत देखभाल दुरुस्तीच्या कामासाठी ५ कोटी २७ लाख रुपये, तर कामगारांच्या वेतनासाठी ५ कोटी ४५ लाख रुपये खर्च तीन वर्षांसाठी अपेक्षित धरला आहे. जर २५० एमएलडीच्या प्रकल्पाचे देखभाल -दुरुस्तीसाठी ५ कोटी ४५ लाख रुपये खर्च येतो. तर ३०० एमएलडी प्रकल्पाच्या खर्चासाठी १० कोटी १ लाख रुपये खर्च कसा येतो, असाही प्रश्‍न उपस्थित केला जात आहे.

loading image