esakal | माणसांमुळे प्राण्यांनादेखील कोरोना संसर्गाचा धोका

बोलून बातमी शोधा

Lion
माणसांमुळे प्राण्यांनादेखील कोरोना संसर्गाचा धोका
sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे - माणसांमुळे (Human) प्राण्यांनादेखील कोरोना संसर्गाचा (Coronvirus) धोका (Danger) होऊ शकतो. या अनुषंगाने पर्यावरण, वन आणि हवामान बदल मंत्रालयाच्या वतीने देशभरातील राष्ट्रीय उद्याने, अभयारण्य व इतर संरक्षीत भागांमध्ये असलेल्या प्राण्यांच्या सुरक्षिततेसाठी (Security) सूचना जारी केल्या आहेत. (risk of corona infection in humans as well as animals)

संसर्गाचा धोका हा प्राण्यांना देखील होऊ शकतो. याच पार्श्‍वभूमीवर बायोस्फिअर्स संस्थेतर्फे प्राण्यांतील संसर्गाबाबत संशोधनाची मागणी केली होती. याबाबत संस्थेच्यावतीने पर्यावरण, वन आणि हवामानबदल मंत्रालयाला पत्र देण्यात आले होते.

हेही वाचा: बारामतीकरांना काहीसा दिलासा; पण उद्यापासून कडक लॉकडाऊन

संस्थेचे संस्थापक अध्यक्ष डॉ. सचिन पुणेकर म्हणाले, ‘‘कोरोनाचा संसर्ग प्राण्यांना झाला, तर त्यांच्यावरील उपचारांचा अभ्यास महत्त्वाचा आहे. वन्य प्राण्यांबरोबर पाळीव प्राण्यांनाही कोरोना संसर्ग होण्याची शक्यता आहेत. प्राण्यांच्या संवर्धनासाठी हे संशोधन होणे गरजेचे असून यासाठी शासनाने समिती स्थापन केली आहे. वाघांबरोबर खवले मांजर, चांदी अस्वल, विजल मार्टिन, पाळीव मांजर आणि भटक्या कुत्र्यांचे कोरोनाबाबत संशोधन होणे आवश्‍यक आहे.’’

काय आहेत सूचना

  • अभयारण्य, राष्ट्रीय उद्यान आणि इतर संरक्षित भागांतील पर्यटन बंद

  • प्राण्यांना संसर्गाची शंका असल्यास नोडल अधिकाऱ्याला माहिती द्या

  • टास्क फोर्स किंवा रॅपिड ॲक्शन फोर्स स्थापित करणे

  • प्राण्यांच्या त्वरित उपचारासाठी सुविधा उभारावी

  • विविध विभागांशी समन्वय साधत प्राण्यांच्या वर्तणुकीवर लक्ष ठेवणे

  • संसर्गाचा प्रसार रोखण्यासाठी योग्य उपाययोजना कराव्यात

  • मंत्रालयाला वेळोवेळी अहवाल देणे

पुण्याच्या ताज्या बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा