
या वाहनांतून प्रवास करणारे काही लोक जखमी झाल्याचे समजते. नेमके किती लोक वाहनातून प्रवास करत होते हे समजू शकलेलं नाही.
बारामती : ओव्हरटेक करण्याच्या प्रयत्नात झालेल्या अपघातात चार वाहने पलटी होऊन अपघात झाल्याची घटना घडली आहे. मोरगाव बारामती रस्त्यावर मेडद नजीकच्या पेट्रोलपंपासमोर हा भीषण अपघात झाला. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार दोन पिकअप गाड्या, एक मारुतीची इको कार तसेच एक तवेरा अशा चार गाड्यांचा विचित्र अपघात झाला. या वाहनांतून प्रवास करणारे काही लोक जखमी झाल्याचे समजते. नेमके किती लोक वाहनातून प्रवास करत होते हे समजू शकलेलं नाही.
पुण्यातील अन्य बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा
या अपघाताची माहिती मिळताच सिल्व्हर ज्युबिली रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ. सदानंद काळे यांनी तात्काळ रुग्णवाहिका घटनास्थळी पाठवल्या. अपघातग्रस्तांना तातडीने वैद्यकीय मदत मिळण्यास मदत झाली. बारामती तालुका पोलिसही अपघाताची माहिती मिळताच घटनास्थळी पोहोचले. अपघाताचे कारण ओव्हरटेक असल्याचे काही प्रत्यक्षदर्शींनी सांगितले. रस्त्याचे सुरु असलेले काम व भरधाव वेगाने वाहने चालविण्याच्या प्रकारामुळे अपघात झाल्याचेही काहींचे म्हणने आहे.