
हडपसर : भूसंपादना अभावी गेली अनेक वर्षांपासून रखडलेल्या काळेपडळ येथील डी. पी. रस्त्याच्या विकासाचा मार्ग आता मोकळा झाला आहे. नुकतीच येथील जागा हस्तांतरण प्रक्रिया पार पडली असून ती महापालिकेकडे वर्ग करण्यात आली आहे. या रस्ते विकासामुळे परिसरातील नागरिकांना मोठा दिलासा मिळणार आहे. सकाळने यापूर्वी या रस्त्याच्या विकासाचा प्रश्न मांडला होता.