esakal | बिबट्याने अडविला रस्ता 
sakal

बोलून बातमी शोधा

pargoan

पारगाव (पुणे) : काठापूर बुद्रुक (ता. आंबेगाव) येथे पुन्हा एकदा मंगळवारी रात्री अकरा वाजता बिबट्याचे दर्शन झाल्याने भीती निर्माण झाली आहे. मागील आठ दिवसांपासून रोजच बिबट्या कोणाला न कोणाला दिसत आहे.

बिबट्याने अडविला रस्ता 

sakal_logo
By
sudam bidkar

पारगाव (पुणे) : काठापूर बुद्रुक (ता. आंबेगाव) येथे पुन्हा एकदा मंगळवारी रात्री अकरा वाजता बिबट्याचे दर्शन झाल्याने भीती निर्माण झाली आहे. मागील आठ दिवसांपासून रोजच बिबट्या कोणाला न कोणाला दिसत आहे.

किसन करंडे, दीपक करंडे व किशोर करंडे हे घरी जात असताना त्यांना अंबोबावस्ती या ठिकाणी बिबट्या रस्त्याच्या कडेला बसलेला दिसला. त्यांनी परिसरातील नागरिकांना याबाबत माहिती दिली. नागरिक त्या ठिकाणी जमा झाल्यानंतरही बिबट्याने जागा सोडली नाही. काही जणांनी मोबाईलमध्ये बिबट्याचे छायाचित्र काढले. बऱ्याच वेळाने बिबट्या त्या ठिकाणाहून निघून गेला. 

आंबेगाव तालुक्‍याच्या पूर्वेकडील भागामध्ये मागील पाच-सहा वर्षांपासून बिबट्याची दहशत वारंवार जाणवत आहे. आतापर्यंत तीन मोठ्या बिबट्यांना जेरबंद करण्यात आले आहे. एका भाजलेल्या बछड्याला पकडण्यात आले, तर एका बिबट्याचा मृत्यू या परिसरात झाला आहे. मोटारसायकलवर जाणाऱ्या शेतकऱ्यांवर तीन वेळा बिबट्याने हल्ला केला आहे. वन विभागाकडून कुठलीच प्रकारची ठोस उपाययोजना अजूनपर्यंत झालेले नाही. तात्पुरत्या स्वरूपात पिंजरा लावला जातो. परंतु सध्या बिबट्या हुलकावण्या देत असून पिंजऱ्यात जेरबंद होत नाही. त्यामुळे बिबट्याची दहशत आहे. 

दिवसा विजेची मागणी 
वीज वितरण कंपनीकडे या परिसरातील ग्रामस्थ दिवसा वीज द्यावी, अशी मागणी करत आहेत. परंतु अजूनही परिसरात चार दिवस दिवसा तर तीन दिवस रात्रीची वीज दिली जाते. त्यामुळे रात्रीची वीज असताना जीव मुठीत धरून शेतकऱ्यांना पाणी भरावे लागत आहे. त्याच पद्धतीने शासनाच्या वतीने येथील शेतकऱ्यांना घर आणि गोठ्यासाठी संरक्षण जाळी उपलब्ध करून देण्याची मागणी होत आहे. 

loading image
go to top