agitation for onion rate in manchar
sakal
मंचर - कांद्याला उत्पादन खर्चाच्या तुलनेत किमान २५ रुपये प्रतिकिलो बाजारभाव मिळावा आणि विधानसभा निवडणुकीदरम्यान कांदा उत्पादकांना दिलेल्या आश्वासनांची पूर्तता मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी करावी, या मागणीसाठी मंगळवारी (ता. २) पुणे-नाशिक राष्ट्रीय महामार्गावरील भोरवाडी-तांबडेमळा (ता. आंबेगाव) येथील नंदी चौकात शेतकरी व विरोधी पक्षांच्या नेत्यांनी रास्ता रोको आंदोलन केले. यावेळी संतप्त शेतकऱ्यांनी राज्य व केंद्र सरकारविरोधात जोरदार घोषणाबाजी केली.