Pune News : पथ विभागाच्या कामांची होणार पोलखोल? महापौरांनी मागितला आठ दिवसात अहवाल

पुणे शहरात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झालेले असताना महापौर मंजूषा नागपुरे यांनी पथ विभागाची घेतली झाडाझडती.
Pune Mayor Manjusha Nagpur

Pune Mayor Manjusha Nagpur

sakal

Updated on

पुणे - पुणे शहरात खड्ड्यांचे साम्राज्य निर्माण झालेले असताना महापौर मंजूषा नागपुरे यांनी पथ विभागाची झाडाझडती घेतली. दरवर्षी कोट्यवधी रुपये रस्त्यांवर खर्च होत असतानाही खड्डे का पडले आहेत?, कामांचा दर्जा निकृष्ट आहे का?, दोष दायित्व कालावधीत कामे का करून घेतली जात नाहीत? असे प्रश्‍न उपस्थित केले. त्यावर प्रशासनाने खुलासा केला पण त्यावरून समाधान न झाल्याने पुढील आठ दिवसांत गेल्या वर्षभरातील कामांचा रस्त्यानुसार सविस्तर अहवाल देण्याचे आदेश महापौरांनी दिले आहेत.

Loading content, please wait...
Marathi News Esakal
www.esakal.com