
आंबेठाण : अवघ्या काही वर्षांपूर्वी करण्यात आलेला म्हाळुंगे इंगळे ते बिरदवडी ( ता.खेड ) हा डांबरी रस्ता जलवाहिनीच्या कामासाठी खोदला जात आहे.आधीच वाहतूककोंडीने त्रस्त झालेल्या चाकण एमआयडीसीतील नागरिकांची या खोदाईमुळे अजून डोकेदुखी वाढली आहे.काही ठिकाणी जवळपास निम्मा डांबरी रस्ता या कामात खोदला जात आहे. यामुळे स्थानिक नागरिकांसह प्रवाशांना धुळीचा आणि वाहतूककोंडीचा सामना करावा लागत आहे. हे काम झाल्यानंतर हा रस्ता दुरुस्त केला जाईल की नाही ? याबाबत स्थानिक नागरिक साशंक आहेत.