Pune News : महंमदवाडी परिसरातील डी.पी. रस्त्यांना मुहूर्त कधी?

दळणवळणाची गरज लक्षात घेऊन महानगरपालिकेने सुमारे वीस वर्षापूर्वीच्या विकास आराखड्यात काही रस्ते प्रस्तावित केले होते.
road in Mahamadwadi area road construction not started pune administration
road in Mahamadwadi area road construction not started pune administration sakal
Updated on

हडपसर : महंमदवाडी परिसरात झपाट्याने नागरिकरण वाढत आहे. या भागातील दळणवळणाची गरज लक्षात घेऊन महानगरपालिकेने सुमारे वीस वर्षापूर्वीच्या विकास आराखड्यात काही रस्ते प्रस्तावित केले होते.

मात्र, अद्यापही हे रस्ते विकसित न झाल्याने येथील मुख्य रस्त्यावर वाहतूकीचा ताण वाढत आहे. अरूंद रस्ता, सोसायट्यांच्या परिसरात त्यामुळे राहणारी सततची वर्दळ आणि वारंवार होणारी वाहतूकोंडी यामुळे प्रवाशांसह रहिवासीही मेटाकुटीला आले आहेत. त्यामुळे प्रस्तावित असलेल्या येथील रस्त्यांना मुहूर्त कधी मिळणार, असा संतप्त सवाल नागरिकांकडून केला जात आहे.

या परिसरात महंमदवाडी गावठाण, वाडकर मळा, हिंगणे मळा ते हडपसर, एन आयबीएम रोड, दोराबजी मॉल, घुले नगर, वाडकर मळा चौक, हेवन पार्क ते वानवडी, वाडकर मळा नाल्यालगत ते हडपसर असे चार रस्ते प्रस्तावित आहेत. त्यातील दोन रस्त्यावरून वाहतूकही सुरू आहे. मात्र, हे रस्ते अद्यापही विकसित झालेले नाहीत.

हे रस्ते झाल्यास सध्याच्या महंमदवाडी हडपसर रस्त्यावरील ताण मोठ्याप्रमाणात कमी होण्यास मदत होणार आहे. याबाबत स्थानिक लोकप्रतिनिधी व नागरिकांनी अनेक वेळा पालिकेकडे या रस्त्यांच्या विकासाची मागणी केली आहे.

मात्र, पालिका प्रशासनाकडून अद्यापही त्याची दखल घेतलेली नाही. त्यामुळे नागरिकांना व प्रवाशांना वारंवार कोंडीशी सामना करावा लागत आहे. दरम्यान, या रस्त्यांच्या विकासाबाबत माजी नगरसेविका विजया वाडकर यांनी महापालिका आयुक्त विक्रम कुमार यांची भेट घेऊन त्यांना निवेदन दिले आहे. ॲड. मच्छिंद्र वाडकर, मुकेश वाडकर, मंगेश वाडकर, पोपट वाडकर, सागर वाडकर, मोहन वाडकर, दिनेश वाडकर आदी यावेळी उपस्थित होते.

"महंमदवाडी परिसरातील चारही डी.पी. रस्ते अनेक वर्षे प्रलंबित आहेत. आता मात्र सध्याचा मुख्य रस्ता वाहतुकीचा ताण सहन करू शकत नाही. त्यामुळे त्याला पर्यायी या डी.पी. रस्त्यांच्या विकासाची गरज आहे. आयुक्तांना त्याबाबतचे निवेदन दिले आहे. त्यांनी या रस्त्यांच्या विकासाबाबत सकारात्मकता दर्शविली असून अधिकाऱ्यांना त्यासाठीची बैठक बोलविण्यास सांगितले आहे. या बैठकीत डी.पी. रस्ते विकासाचा प्रश्न मार्गी लागेल, अशी अपेक्षा आहे.'

- विजया वाडकर, माजी नगरसेवक

"नागरिकरण वाढल्यामुळे या भागात रस्ते विकसित होणे गरजेचे झाले आहे. आम्ही बाधित शेतकरीही त्यासाठी तयार आहोत. पालिकेने त्याला प्राधान्य द्यावे.'

-नामदेव वाडकर - शेतकरी, वाडकरमळा

"मंहमदवाडीतील डी. पी. रस्ते विकसित करण्यासाठी पालिकेतील संबंधित खाते प्रमुख व रस्त्यामध्ये बाधित होणाऱ्या शेतकऱ्यांची बैठक लावण्यात येणार आहे. ही बैठक सकारात्मक झाल्यास लगेचच रस्ते विकासाच्या दृष्टीने कार्यवाही केली जाईल.'

- विकास ढाकणे अतिरिक्त आयुक्त, महापालिका

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.