
देहूरोड: कात्रज–देहूरोड बाह्यवळण मार्गावरील देहूरोड हद्दीत द्वारका सोसायटीसमोर भरधाव वेगात जाणाऱ्या अवजड वाहनाने मागून धडक दिल्याने दुचाकीस्वार ठार झाला. रविवारी सकाळी साडेनऊच्या सुमारास हा अपघात घडला. द्वारका सोसायटीमधील संतप्त रहिवाशांनी रस्ता रोखून धरल्याने काही काळ वाहतूक कोंडी झाली.