विद्या प्रतिष्ठानमध्ये रस्ते सुरक्षेबाबत जनजागृती

विद्या प्रतिष्ठानमध्ये 
रस्ते सुरक्षेबाबत जनजागृती
Published on

बारामती, ता. २० : विद्यार्थ्यांनी वाहतुकीच्या नियमांचे पालन करून देशाचे जबाबदार नागरिक बनावे, असा संदेश होंडा मोटरसायकल अँड स्कूटर इंडिया प्रा. लि.चे रस्ते सुरक्षा प्रशिक्षक आनंद कांबळे यांनी दिला.
विद्या प्रतिष्ठान इंग्लिश मीडियम स्कूल (सीबीएसई) येथे बुधवार (ता. १२) आणि गुरूवारी (ता. १३) विद्यार्थ्यांसाठी ‘रस्ते सुरक्षा जागरूकता’ कार्यशाळा झाली. यावेळी कांबळे बोलत होते. कार्यशाळेत रस्ते वाहतुकीचे नियम, रस्त्यांवरील वाहतूक चिन्हे, पादचारी व वाहनचालकांचे रस्त्यावरील योग्य वर्तन, हेल्मेट व सीट बेल्टचा वापर, वाहनांच्या टायरमधील हवेचा योग्य दाब तसेच वाहनातून प्रवास करताना घ्यावयाची काळजी याबाबत प्रात्यक्षिकांसह मार्गदर्शन करण्यात आले.
विद्यार्थ्यांनी उत्स्फूर्तपणे सहभाग घेत रस्ते सुरक्षेबाबत विविध प्रश्न विचारले. विद्यार्थ्यांमध्ये लहान वयापासूनच वाहतूक नियमांबाबत जागरूकता निर्माण करून सुरक्षित रस्ते संस्कृती रुजविणे, हा कार्यशाळेचा मुख्य उद्देश होता. प्राचार्या राधा कोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तानाजी निकम व धनेश करचे यांनी कार्यशाळेचे संयोजन केले.

Marathi News Esakal
www.esakal.com