आंबेगावात पावसाळ्याच्या सुरुवातीलाच रस्त्यांची वाताहत; खड्डेमय रस्त्यावर पाणी साचले | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Ambegaon Road

यंदा मान्सून पुणे शहरात उशिरा दाखल झाला आहे. तरीही पावसाच्या सुरुवातीलाच उपनगरातील रस्ते पाणीमय झाले आहेत.

आंबेगावात पावसाळ्याच्या सुरुवातीलाच रस्त्यांची वाताहत; खड्डेमय रस्त्यावर पाणी साचले

आंबेगाव - पुणे परिसर आणि उपनगरात गेली चार दिवसापासून चांगली सुरुवात झाली आहे. दरम्यान आंबेगाव बुद्रुक, खुर्द तसेच आंबेगाव पठार परिसरात रस्त्यांची वाताहत झाली असून जवळपास सगळ्याच मुख्य रस्त्यावर पाण्याची डबकी नाहीतर मोठे डोह साचले आहेत. डोहात फक्त पाणीच नसून यात न दिसणारे मोठं मोठे खड्डेही पडलले आहेत. तर अनेक ठिकाणी रस्ते खचले आहेत.

यंदा मान्सून पुणे शहरात उशिरा दाखल झाला आहे. तरीही पावसाच्या सुरुवातीलाच उपनगरातील रस्ते पाणीमय झाले आहेत. दत्तनगर नऱ्हे रस्त्यावरील दळवीनगर येथे पाण्याचा मोठा डोह साचला आहे. तर या डोहामध्ये मोठे खड्डे पडले आहेत. यात वाहनचालकांना मोठी कसरत करावी लागत आहे. तर महिला दुचाकीस्वार खड्ड्यात घसरून पडण्याच्या घटना घडत आहेत. आंबेगाव बुद्रुक येथील गायमुख स्मशानभूमी जवळील चौकात पालिकेकडून टाकण्यात आलेल्या ड्रेनेजचे झाकण ड्रेनेजमध्ये पडले आहे. त्यामुळे याठिकाणी मोठा खड्डा पडला आहे.

दत्तनगर नऱ्हे रस्त्यावरील देवीवेल स्टील समोर पावसाळी वहिनीजवळ मोठा खड्डा पडला असून अपघात होण्याची शक्यता वाढली आहे.

आंबेगाव पठार येथेही रस्ते जलमय!

आंबेगाव पठार येथील जिजामाता चौक ते तीन बत्ती चौक दरम्यान सूर्या चौकामध्ये पावसाळ्यामध्ये रस्त्यावर पाण्याचा डोह साचला जातो. यातून वाहन चालकांना प्रवास करताना कसरत करावी लागते आहे. या रस्त्यावर पालिकेकडून पावसाळी लाइन टाकावी अशी मागणी स्थानिकांनी केली आहे.

प्रतिक्रिया -

'पाऊस उघडल्यानंतर पालिकेकडून आपत्कालीन कक्ष आणि आरोग्य सेवक यांच्या सहाय्याने रस्त्यावर साचलेल्या पाण्याचा निचरा केला जातो. त्यानंतर तात्काळ डागडुजीही केली जाते. धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालयात आपत्कालीन कक्ष सुरु आहे. नागरिकांनी आपत्कालीन स्थिती उद्भवल्यास त्वरित कक्षाला संपर्क साधावा.आपत्कालीन कक्ष चोवीस तास सुरु आहे.

- विजय वाघमोडे, सहाय्यक आयुक्त धनकवडी सहकारनगर क्षेत्रीय कार्यालय.

'आंबेगाव दळवीनगर येथील पंढरपूर अर्बन बँक समोर पाण्याचा मोठा डोह साचलेला आहे. त्यामुळे महिलांना वाहन चालवताना त्रास होतो.येथे वाहने खड्डा आणि पाणी असल्यामुळे स्लो होतात. त्यामुळे बऱ्याच वेळा ट्रॅफिक पण होते आहे.

- सुवर्णा सावर्डे, स्थानिक दळवीनगर आंबेगाव बुद्रुक

'पाणी साचत असलेल्या ठिकाणी पालिकेने चेंबर बसवावेत यासाठी पालिकेकडे पाठपुरावे करतो आहे. पण पालिकेकडून हवा तितका प्रतिसाद मिळत नाही. पाणी साचत असलेल्या ठिकाणी महिला, विद्यार्थ्यांसह नागरिकांना त्रास होतो आहे.

- युवराज रेणुसे, स्थानिक आंबेगाव पठार

Web Title: Roads In Ambegaon Are Windy Beginning Of Monsoon Rocky Road Was Flooded

Read Latest Marathi News Headlines of Maharashtra, Live Marathi News of Mumbai, Pune, Politics, Finance, Entertainment, Sports, Jobs, Lifestyle at Sakal. To Get Updates on Mobile, Download the Sakal Mobile App for Android & iOS.
सकाळ आता सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर. ताज्या घडामोडींसाठी टेलिग्राम, फेसबुक, ट्विटर, शेअर चॅट आणि इन्स्टाग्रामवर आम्हाला फॉलो करा तसेच, आमच्या YouTube Channel आजच Subscribe करा..