ते आले...पिस्तुल दाखवले आणि भरदिवसा व्यापाऱ्याला लुटले; मुंढव्यात थरार!

 robbed the merchant on gunpoint in Mundhwa pune
robbed the merchant on gunpoint in Mundhwa pune

पुणे ः वेळ शुक्रवारी दुपारी सव्वा तीनची. ठिकाण - माणसांच्या गर्दीने नेहमी गजबजलेले केशवनगरमधील झेड कॉर्नरचा परिसर. दुचाकीवरुन आलेले दोघेजण लाकुड विक्रीच्या दुकानात येतात. दुकानदारास दमदाटी करत, "पैसे निकालो' म्हणतात. "तुम्हारे पास बीस लाख रुपये आये है', असे बोलत त्याने कमरेला लावलेली पिस्तुल काढली, त्यातील मॅगझिन काढून, व्यापाऱ्याला त्यात गोळ्या असल्याचे दाखविले. त्यानंतर त्याने फिर्यादीच्या पोटाला पिस्तुल लावीत, त्यांच्या दुकानाच्या गल्ल्यातील 44 हजार रुपये घेऊन दोघेजण पसार झाले. 

एखाद्या चित्रपटातील प्रसंग उलगडत आहे, असे तुम्हाला वाटेल, परंतु हि सत्यघटना आहे. भरदिवसा मुंढवा पोलिस ठाण्याच्या हद्दीत पिस्तुलाचा धाक दाखवून व्यापाऱ्याला लुटल्याचा हा प्रकार आहे.

दुखःद ! मुलाचा रांजणखळग्यात बुडून मृत्यू, वडिलांचे हृदयविकाराने निधन​

जालाराम प्रजापती (वय 45, रा. मांजरी बुद्रुक) हे नेहमीप्रमाणे मुंढव्यातील केशवनगरच्या झेड कॉर्नरजवळ असलेल्या त्यांच्या गणेश टिंबर मार्केट या लाकुड विक्रीच्या दुकानात बसले होते. दुपारची वेळ असल्याने ग्राहकांची व रस्त्यावर नागरीकांची फारशी वर्दळ नव्हती. दुपारी सव्वा तीन वाजले. त्यावेळी त्यांच्या दुकानासमोर एक दुचाकी उभी राहिली. प्रजापती यांना वाटले ग्राहक आले. पण ते ग्राहक नव्हते. दुकानात पाऊल ठेवताच, एकाने, प्रजापती यांना "पैसे निकालो', म्हणत धमकाविण्यास सुरूवात केली. त्याचवेळी दुसऱ्याने "तुम्हारे पास बिस लाख रुपये आया है', असे प्रजापती यांनाच सांगत त्याने शर्टाच्या आतील बाजुस कमरेला खोवलेले पिस्तुल काढले.

दुकानदाराला ती खरोखरीची पिस्तुल असल्याचे दाखविण्यासाठी, त्याने पिस्तुलमधील मॅगझिन काढून त्यातील गोळ्या दुकानदाराला दाखविल्या. त्यानंतर मॅगझिन पिस्तुलमध्ये टाकून ते पिस्तुल दुकानदाराच्या पोटाला लावले. तर डाव्या हाताने फिर्यादीचा गळा दाबत त्यांच्याकडे पैशांची मागणी केली. दुकानदाराने घाबरुन मोठमोठ्याने ओरडण्यास सुरूवात केली. त्यावेळी आरोपींनी त्यांना पुन्हा 'चिल्लाओ मत' अशी धमकी दिली. त्याचवेळी दुसऱ्याने दुकानाचे ड्रॉव्हर तपासले, त्यास 20 लाख रुपये आढळले नाहीत. त्यामुळे त्याने दुकानदाराला "तुम्हारे लडके को पांच लाख रुपये लेके बुलाओ' असा आदेश दिला. त्यानंतर त्याने दुसरे ड्रॉव्हर तपासले, तेव्हा त्यास 44 हजार 500 रुपयांची रक्कम मिळाली. अखेर 44 हजार रुपयांची रक्कम घेऊन दोघे दुचाकीवरुन पसार झाले. याप्रकरणी प्रजापती यांनी मुंढवा पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे. 

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com