जुन्नरमध्ये पतसंस्थेवर दरोडा; चोरट्यांकडून व्यवस्थापकाचा खून | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

जुन्नरमध्ये पतसंस्थेवर दरोडा; चोरट्यांकडून व्यवस्थापकाचा खून

जुन्नरमध्ये पतसंस्थेवर दरोडा; चोरट्यांकडून व्यवस्थापकाचा खून

पिंपळवंडी: पुण्यातील जुन्नरमधून एक धक्कादायक बातमी समोर येत आहे. गावातील एका पतसंस्थेवर दरोडा पडला आहे. हा दरोडा घालताना दरोडेखोरांनी एका कर्मचाऱ्यावर गोळीबार देखील केला आहे. या गोळीबारात या कर्मचाऱ्याचा मृत्यू झाल्याचीही माहिती आहे. शिरुर तालुक्यातील पिंपरखेड येथील महाराष्ट बँकेच्या दरोड्याची घटना ताजी असताना जुन्नर तालुक्यात १४ नंबर फाट्यावर दोन दरोडेखोरांनी शस्त्र हातात घेऊन अनंत ग्रामीण पतसंस्थेवर आज दुपारच्या सुमारास दरोडा टाकला.

हेही वाचा: काँग्रेस घाबरली? कार्यालयात लावला इंदिरा गांधींसोबत सरदार पटेलांचा PHOTO

सविस्तर घटना अशी की, पुणे-नाशिक महामार्गावरील नारायणगाव जवळील १४ नंबर फाट्यावर असलेल्या पतसंस्थेवर दरोडा टाकण्यात आला आहे. या दरोड्यामध्ये चोरट्यांना विरोध करणा-या कर्मचा-यावर गोळीबार देखील करण्यात आला आहे. अनंत ग्रामीण पतसंस्था असं या पतसंस्थेचं नाव आहे. या पतसंस्थेतील व्यवस्थापक राजेंद्र दशरथ भोर यांचा गोळी लागून मृत्यू झाला आहे. या संपूर्ण घटनेचा थरार cctv कँमेरात कैद झाला आहे.

नेमकं काय घडलं?

यावेळी बँकेत बँक व्यवस्थापक दशरथ भोर आणि महिला कर्मचारी हजर होते. हद्दीतील चौदा नंबर येथे अनंत ग्रामीण बिगर शेती सहकारी पतसंस्थेत बुधवारी(ता.२४) दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास पतसंस्थेत आलेल्या दोन अज्ञात इसमांनी गोळीबार केला यामध्ये व्यवस्थापक राजेंद्र दशरथ भोर (वय ५२) यांचा मृत्यू झाला आहे. दुपारी दीड वाजण्याच्या सुमारास व्यवस्थापक राजेंद्र भोर व लिपिक अंकिता नेहरकर हे जेवण करत असताना दोन अज्ञात व्यक्तींनी पतसंस्थेत प्रवेश करून व्यवस्थापक राजेंद्र भोर यांच्याकडे पैशाची मागणी करत गोळीबार केला. यामध्ये राजेंद्र भोर यांना उपचारासाठी नारायणगाव याठिकाणी नेत असताना उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले आहे. यातील एकाने एक लालसर शर्ट व एक निळा रंगाचा शर्ट घातला असुन दोघांनी डोक्यात हेल्मेट घातले असुन ते दुचाकीवर आले होते. अडीच लाखाची रक्कम चोरट्यांनी चोरून नेली असल्याचा प्राथमिक अंदाज आहे. या घटनेचा सी.सी.टी. व्ही. कॅमेऱ्यात कैद झाला आहे. पुढील तपास नारायणगाव पोलीस स्टेशनचे अधिकारी पोलीस निरीक्षक विलास देशपांडे व पृथ्वीराज ताटे करत आहेत.

याच दरम्यान दोन दरोडेखोर हातात पिस्तुल घेऊन धमकावत होते. याच दरम्यान व्यवस्थापक दशरथ भोर यांनी विरोध केला असता त्यांच्यावर पिस्तुलातून गोळी झाडण्यात आली. यामध्ये बँकेचे व्यवस्थापक राजेंद्र दशरथ भोर यांचा मृत्यू झाला. नारायणगाव आणि आळेफाटा पोलीस घटनास्थळी दाखल झाले असुन दरोडेखोरांचा शोध सुरु आहे. दरोडेखोरांनी पिस्तुलाचा धाक दाखवुन दरोडा टाकल्याने परिसरात दहशतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

loading image
go to top