पुणे : वारजेमध्ये एका रात्रीत चोरट्यांनी आठ दुकाने फोडली 

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 24 फेब्रुवारी 2020

मागील आठवड्यामध्ये चोरट्यांनी सहकानरगर येथे एकाच भागातील काही दुकाने फोडली होती. त्या घटनेनंतरही पोलिसांकडून चोरट्यांना शोधण्याचा प्रयत्न झाला नसल्याचा आरोप दुकानदारांनी केला होता. त्यानंतर रविवारी पहाटे पुन्हा वारजे येथे दुकाने, किराणा स्टोअर्स, मेडकीलला चोरट्यांनी लक्ष्य केले. या प्रकारामुळे व्यावसायिकांमध्ये पुन्हा भिती निर्माण झाली आहे. 

पुणे : सहकारनगर येथील दुकानांमधील चोरीच्या पुन्हा एकदा चोरट्यांनी वारजे येथे मेडकील, किराणा स्टोअर्ससह वेगवेगळ्या प्रकारची आठ दुकाने फोडली. संबंधीत दुकानातून सव्वा लाख रुपयांची रोकड चोरट्यांनी चोरुन नेली.दरम्यान, सातत्याने घडणाऱ्या चोरीच्या या घटनांमुळे दुकानदार व व्यावसायिकांनी चोरट्यांची धास्ती घेतल्याची सद्यस्थिती आहे. याप्रकरणी रुपेश कोठारी (वय 35, दांगट औद्योगिक वसाहत, शिवणे) यांनी वारजे पोलिस ठाण्यात फिर्याद दिली आहे.  

पुणे : पिरंगुटमध्ये दुकानांना भीषण आग; जीवितहानी नाही

पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी यांचे शिवणे येथील दांगट औद्योगिक वसाहतीमध्ये अर्हम डिस्ट्रीब्युटर ऍन्ड जनरल स्टोअर्स नावाचे दुकान आहे. शनिवारी रात्री दहा वाजता ते नेहमीप्रमाणे त्यांचे दुकान बंद करुन घरी गेले. त्यानंतर रविवारी पहाटे तीन वाजण्याच्या सुमारास आलेल्या चोरट्यांनी त्यांच्या दुकानाच्या मुख्य दरवाजाचे कुलूप उचकटून आतमध्ये प्रवेश केला. त्यानंतर त्यांनी दुकान व मेडीकलमधील एक लाख दोन हजार रुपयांची रक्कम चोरुन नेली. याबरोबरच फिर्यादी यांच्या आजुबाजुला असणाऱ्या सात दुकानांमध्येही चोरी केले. तेथून 20 हजार 500 रुपये असे एकूण एक लाख 22 हजार 500 रुपयांची रक्कम चोरुन नेली. 

अरे बापरे! मानाच्या विड्यासाठी मोजले तब्बल ३० लाख! कोठे ते पहा?

मागील आठवड्यामध्ये चोरट्यांनी सहकानरगर येथे एकाच भागातील काही दुकाने फोडली होती. त्या घटनेनंतरही पोलिसांकडून चोरट्यांना शोधण्याचा प्रयत्न झाला नसल्याचा आरोप दुकानदारांनी केला होता. त्यानंतर रविवारी पहाटे पुन्हा वारजे येथे दुकाने, किराणा स्टोअर्स, मेडकीलला चोरट्यांनी लक्ष्य केले. या प्रकारामुळे व्यावसायिकांमध्ये पुन्हा भिती निर्माण झाली आहे. 

फक्त मौज-मजेसाठी 'त्यांनी' चोरल्या 25 दुचाकी

स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Robbery at eight shops in Warje in One Night

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: