आता फक्त देशसेवा करायची - रोहन

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 31 मे 2018

पुणे - राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतून बाहेर पडतोय. आता फक्त देशसेवा करायची आहे, अशी भावना नाशिक जिल्ह्यातील रोहन गांगुर्डे यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली.

पुणे - राष्ट्रीय संरक्षण प्रबोधिनीतून बाहेर पडतोय. आता फक्त देशसेवा करायची आहे, अशी भावना नाशिक जिल्ह्यातील रोहन गांगुर्डे यांनी ‘सकाळ’शी बोलताना व्यक्त केली.
रोहनचे आई पुष्पा वडील अर्जुन आणि बहीण शिवानी हे दीक्षान्त संचलन सोहळ्यासाठी पुण्यात आले होते. त्याचे वडील केंद्रीय औद्योगिक सुरक्षा दलामध्ये हेड कॉन्स्टेबल आहेत. ते म्हणतात, ‘‘मीदेखील सैन्यात आहे. त्यामुळे मुलाने देशसेवा करावी, असे वाटत होते म्हणून त्याला एनडीएमध्ये पाठविण्याचा निर्णय आम्ही घेतला आहे.’’ त्याच्या आई आणि बहिणीनेही रोहन लष्करात जात असल्याबद्दल गर्व असल्याची भावना व्यक्त केली. रोहन म्हणाला, ‘‘आता लष्करात जाऊन देशाची सेवा करीन. एनडीएमधील तीन वर्षांत खूप शिकायला मिळाले. शेवटच्या वर्षात लष्कराची खूप माहिती मिळाली. आता देशसेवेसाठी तयार आहे.’’

Web Title: Rohan Gangurde expresses the feeling that only one wants to serve the country