Fortification Collapse : रोहिडेश्वर (विचित्रगड) किल्यावरील तटबंदी ढासळली

भोर शहराच्या दक्षिणेला १२ किलोमीटर अंतरवरील बिनीचा किल्ला समजल्या जाणा-या रोहिडेश्वर (विचित्रगड) किल्यावरील मुख्य प्रवेशव्दाराजवळील तटबंदी ढासळली.
Rohideshwar Fortification Collapse
Rohideshwar Fortification CollapseSakal
Updated on

भोर - शहराच्या दक्षिणेला १२ किलोमीटर अंतरवरील बिनीचा किल्ला समजल्या जाणा-या रोहिडेश्वर (विचित्रगड) किल्यावरील मुख्य प्रवेशव्दाराजवळील तटबंदी ढासळली. गुरुवारी (ता.१०) रात्री ही दुर्घटना घडली असून गडकरी शंकर धावले व चंद्रकांत भागवत यांना शुक्रवारी (ता.११) सकाळी ही गोष्ट लक्षात आली.

तटबंदीची पडझड ही रात्रीच्या वेळी झाल्याने कोणतीही जिवीतहाणी झाली नाही मात्र गडावर जाणारी पायावट बंद झाली आहे. याशिवाय गडावरील काही बुरूजांच्या तटबंदीलाही अनेक ठिकाणी पडल्या भेगा आहेत. त्यामुळे आणखी तटबंदी ढासळण्याची शक्यता वर्तवली जात आहे.

Rohideshwar Fortification Collapse
Pune Potholes : शहरात हजारो खड्डे; नोटीस फक्त एका कनिष्ठ अभियंत्याला

तालुक्यात अधूनमधून पावसाच्या हलक्या सरी पडत असून वादळी वारे वाहू लागले आहे. यामुळे गुरुवारी रात्री रोहिडेश्वरावरील तटबंदी ढासळली. तटबंदीचे दगडी-माती व चुनखडीचा राडा रोडा हा गडावर जाण्याच्या पाऊल वाटेवर आला आहे.

त्यामुळे त्या राडारोड्यावरून गडावर जावे लागत आहे. पर्यटकांनी गडावर जाताना विशेष काळजी घावी असे आवाहन गडाच्या पायथ्याशी असलेल्या बाजारवाडी ग्रामपंचायतकडून करण्यात आले.

Rohideshwar Fortification Collapse
Pune Accident : पुण्यातील कात्रज कोंढवा रस्त्यावर 10 वाहनांचा भीषण अपघात; 1 मृत्यू, 5 गंभीर

रोहिडेश्वर किल्याची उंची समुद्रसपाटीपासून ३ हजार ६२५ फूट आहे. बाजारवाडी गावापासून किल्ल्यावर चढून जाण्यासाठी असलेल्या पायवाटेने एका तासात जाता येते. उत्तराभिमुख असलेल्या मुख्य प्रवेशव्दारावर भक्कम गणेश पट्टी असून तिच्यावर मिहराब आहे. याच प्रवेशव्दाराजवळच्या बुरुजासारखी दिसणारी तटबंदी ढासळल्यामुळे गडाचे ऐतिहासिक महत्व कमी होण्याची शक्यता आहे.

Rohideshwar Fortification Collapse
Pune Accident : पुण्यातील कात्रज कोंढवा रस्त्यावर 10 वाहनांचा भीषण अपघात; 1 मृत्यू, 5 गंभीर

शासनाची किल्ले संवर्धन योजना फक्त कागदावरच असल्याचे चित्र दिसत असून पुरातत्व विभागाकडून किल्याचे संवर्धन केले जावे अशी अपेक्षा गड़प्रेमी व्यक्त करीत आहेत. चौकट - पर्यटकांच्या दृष्टीने रोहिडेश्वर ( रोहिडा ) हा ऐतिहासिक किल्ला असून गड पाहण्यासाठी मोठ्या प्रमाणात पर्यटक गर्दी करत असतात.

किल्ल्याच्या संवर्धनासाठी शासन निधी उपलब्ध करत नसल्यामुळे गडाची पावसाळ्या मध्ये ढासळण्याचे प्रमाण वाढत आहे. तरी पुरातत्त्व खात्याने किल्ले रोहिडेश्वर ( रोहिडा ) च्या संवर्धन साठी निधी उपलब्ध करून द्यावा.

Rohideshwar Fortification Collapse
Mumbai Crime : आठवडाभरापूर्वी बाहेर आला, पुन्हा घडली जेलची वारी

रोहिडेश्वराच्या संवर्धनासाठी शासनाने निधी द्यावा .

'रोहिडेश्वर या ऐतिहासिक किल्यावर अनेक पर्यटन येत असून त्यांना सेवा देण्यासाठी आणि किल्याच्या संवर्धनासाठी ग्रामपंचायतीस निधीची आवश्यक्ता आहे.

शासनाकडून निधी मिळाल्यास किल्याच्या संवर्धनाबरोबर पर्यटकांना आरोग्या व इकर सेवा देण्यात येतील'. सीताबाई गुरव, सरपंच - बाजारवाडी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com