Rohit Arya
sakal
पुणे - मुंबईच्या पवई परिसरात निवड चाचणीसाठी आलेल्या १७ लहान मुलांना ओलीस ठेवल्यानंतर पोलिसांच्या गोळीबारात मृत्यू झालेल्या रोहित आर्य या तरुणाने गेल्याच वर्षी पुण्यात उपोषणाचे आंदोलन केले होते. त्यावेळी आंदोलनादरम्यान त्याला अचानक फिट आल्याने गोंधळ उडाला होता. तात्काळ आर्य यांना रुग्णालयात दाखल करण्यात आले होते.