चंद्रकांत पाटलांच्या त्या विधानाचा रोहित पवारांनी घेतला समाचार | Politics | Sakal
sakal

बोलून बातमी शोधा

Rohit-Pawar
चंद्रकांत पाटलांच्या त्या विधानाचा रोहित पवारांनी घेतला समाचार

चंद्रकांत पाटलांच्या त्या विधानाचा रोहित पवारांनी घेतला समाचार

sakal_logo
By
कल्याण पाचांगणे

माळेगाव - प्रधानमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या हिताच्यादृष्टीने वादग्रस्त ठरलेले तिनही कृषी कायदे मागे घेतले, ही गोष्ट स्वागर्ताय आहे. परंतु हे कायदे मागे घेण्यासाठी झालेल्या आंदोलनात सातशे लोकांचे बळी गेले, याचेही दुःखही तितकेच आहे. असे असतानाही भाजपचे प्रदेशाध्यक्ष चंद्रकांतदादा पाटील यांनी मात्र या धोरणात्मक निर्णयाबाबत केंद्राने फेरविचार करावे, असे अश्चर्य़कारक विधान केले. वास्तविक केंद्राने मागे घेतलेले कायदे कसे शेतकऱ्यांच्या हिताचे आहेत, हेच सांगण्यासाठी चंद्रकांतदादा राज्यभर फिरत होते. आता मात्र शेतकऱ्यांना काय सांगायचे?  या विवंचनेत ते असावेत, असा खोचक टोला कर्जत-जामखेडचे आमदार रोहित पवार यांनी बारामतीत पत्रकार परिषदेमध्ये चंद्रकांतदादांना लगावला.

बारामतीमध्ये ज्येष्ठ नेते शरद पवार व प्रतिभाताई यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून आमदार रोहित पवार यांनी सालाबाद प्रमाणे यंदाही १२ जानेवारी २०२२ पर्यंत मोफत हृदयरोग शिबिराचे आयोजन केले आहे. त्यामध्ये अनंत आरोग्य सेवा योजना, तसेच  गिरीराज हॉस्पिटलचे हृदयरोगतज्ञ डॉ. रमेश भोईटे यांच्या संकल्पनेतून महात्मा फुले जन आरोग्य योजनेअंतर्गत मोफत अँजिओग्राफी, अँजिओप्लास्टी व कार्डिऍक बायपास शस्त्रक्रिया या शिबिरात मोफत केल्या जाणार आहेत. याबाबत पत्रकारांशी बोलताना श्री. पवार यांनी कृषी कायद्याविषयी आपली भूमिका मांडली. ते म्हणाले,` युपी आणि पंजाब राज्यात पंचवार्षिक निवडणूकांचे वारे वाहू लागले आहे. त्यामुळे प्रधानमंत्र्यांनी शेतकऱ्यांच्या हिताच्यादृष्टीने वादग्रस्त ठरलेले तिनही कृषी कायदे मागे घेण्याचा हा राजकिय निर्णय तर नाहीना, असेही लोक चर्चा करीत आहेत.`

हेही वाचा: पुणे शहर आणि परिसरात हलक्या सरींची हजेरी

एसटीचा संप केव्हा मिटणार, या प्रश्नाला उत्तर देताना पवार म्हणाले,` एसटी हा सर्वसामान्यांचा आत्मा आहे. त्यामुळे एसटी कर्मचाऱ्यांचे आंदोलन जास्तकाळ चालणे सर्वांच्याच दृष्टीने तोट्याचे आहे. एसटी कर्मचाऱ्यांचे बहुतांशी प्रश्न खरेतर महाविकास आघाडीच्या सरकाने सोडविण्याचा प्रयत्न केला आहेत, परंतु उर्वरित मागण्या सोडविण्यासाठी सरकारला काही कालावधीची गरज आहे. याचा विचार करून आंदोलनकर्त्यांनी समन्वयाची भूमिका घेवून सरकारच्या प्रतिनिधीशी संवाद केला पाहिजे. त्यात खऱ्याअर्थाने सर्वांचे हित आहे, असे मला वाटते.`

दरम्यान, मोफत हृदयरोग शिबिराची माहिती देताना डॉ. रमेश भोईटे म्हणाले,` आमदार रोहित पवार यांच्या सहकार्य़ाने आम्ही गेली चार वर्षात तीन हजार चारशे हृदयाच्या रुग्णांना शस्त्रक्रियेसह विविध सेवासुविधा मोफत दिल्याची नोंद आहे. या कार्य़ाच्या माध्यमातून संबंधित रुग्णांचा सुमारे १६ कोटी रुपयांचा अर्थिक फायदा झाला आहे. आर्थात हे मोठे यश आहे. त्यामुळे यंदाही या शिबीराचा लाभ विशेषतः ग्रामीण भागातील गरजूंना अधिकाधिक व्हावा, यासाठी जनजागृतीच्या माध्यमातून आम्ही रुग्णांपर्यंत पोच आहोत.` बारामती गिरीराज हॉस्पीटलमध्ये शस्त्रक्रिया केलेल्या रुग्णांना राहण्याबरोबर चहा, नाष्ठा, जेवणाची मोफत सोय केली असल्याची माहिती यावेळी भोईटे यांनी आर्वजून सांगितली.

हृदयरोग शिबिरात सेवा देणारे नामांकित डॉक्टरांची नावे पुढील प्रमाणे - डॉ. रमेश भोईटे, डॉ. सनी शिंदे, डॉ. संभाजी राऊत, डॉ. राजीव खरे, डॉ. सुनील साठे, डॉ. प्रसाद शहा, डॉ. केतन आंबर्डेकर, डॉ. धैर्य़शिल कणसे, डॉ. सुरज चव्हाण यांचा समावेश आहे.

loading image
go to top