esakal | 'एनआयए'कडे तपास दिल्याने लोकांच्या मनात शंका : रोहित पवार
sakal

बोलून बातमी शोधा

Untitled-1.jpg

रोहित पवार यांनी ट्विट करत भाजपवर टीका केली आहे. यावरून आता भाजप विरुद्ध ठाकरे सरकार अशा संघर्ष पुढील काळात पेटणार आहे.

'एनआयए'कडे तपास दिल्याने लोकांच्या मनात शंका : रोहित पवार

sakal_logo
By
सकाळ वृत्तसेवा

पुणे : ज्येष्ठ नेते शरद पवार यांनी भीमा कोरेगाव हिंसाचारावरून भाजपवर टीकास्त्र सो़डल्याने राजकीय क्षेत्रात एकच खळबळ उडाली आहे. आता रोहित पवार यांनी देखील भाजपवर निशाणा साधला आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कोरेगाव भीमा दंगलीमागे तत्कालीन देवेंद्र फडणवीस सरकारचं षडयंत्र आहे, असा गंभीर आरोप शरद पवार यांनी केला आहे. तसेच या प्रकरणाची एसआयटी चौकशी करावी अशी मागणीही पवार यांनी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्राद्वारे केली आहे.
पवारांच्या या गंभीर आरोपामुळे सर्वत्र एकच खळबळ उडालेली आहे.

दरम्यान, एका वृत्तपत्राने याबाबत वृत्त प्रसिद्ध केले होते. यावरून आता रोहित पवार यांनी देखील भाजपवर निशाणा साधला आहे. रोहित पवार यांनी ट्विट करत भाजपवर टीका केली आहे. यावरून आता भाजप विरुद्ध ठाकरे सरकार अशा संघर्ष पुढील काळात पेटणार आहे.

हिंदुत्व चळवळीला राज्यघटना अमान्य; शशी थरूर यांचे वक्तव्य

रोहित पवार यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे की, ''भीमा-कोरेगाव हिंसाचाराचा आतापर्यंत तपास करुन आजवर सत्तेत असलेल्या भाजप सरकारने यामागील मेंदू आणि रक्ताने माखलेले हात शोधून त्यांना मुसक्या घालायला पाहिजे होत्या. पण या हिंसाचाराचा तपास महाविकास आघाडी सरकारने विशेष तपास पथकामार्फत निःपक्षपणे करण्याचा निर्णय घेतला.''

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

दुसर्या ट्विटमध्ये रोहित पवार यांनी म्हटले आहे, ''त्यानंतर दोन वर्षे झोपेचं सोंग घेतलेल्या केंद्र सरकारने खडबडून जागं होऊन हा तपास 'एनआयए'कडे दिला. हा निर्णय आताच का घेतला याबाबत लोकांच्या मनात अनेक वेगवेगळ्या शंका निर्माण झाल्या आहेत.''