esakal | हिंदुत्व चळवळीला राज्यघटना अमान्य; शशी थरूर यांचे वक्तव्य
sakal

बोलून बातमी शोधा

shashi-tharoor

उत्तर भारतीय ‘लोकशाही’...
एका चर्चासत्रात प्रसिद्ध लेखक, खासदार शशी थरूर म्हणाले, जनगणनेनुसार १९७१ मध्ये पन्नास वर्षांसाठी भारतीय लोकसभेच्या जागा निश्‍चित झाल्या होत्या. २०२१ च्या जनगणनेनुसार २०२६ मध्ये नव्याने जागा ठरतील. उत्तर भारतातील लोकसंख्या वाढलेली आहे. केरळसारख्या दक्षिण भारतीय राज्यांमधील लोकसंख्या वाढीचा दर घटला आहे. लोकसभेच्या दक्षिण भारतातील सुमारे चाळीस जागा कमी होतील. एकप्रकारे उत्तर भारतीय लोकशाहीकडे भारत वाटचाल करेल.

हिंदुत्व चळवळीला राज्यघटना अमान्य; शशी थरूर यांचे वक्तव्य

sakal_logo
By
सम्राट फडणीस

जयपूर - ब्रिटिशांनी लाजावे अशी पल्लेदार भाषाशैली, मुखोत्गत संदर्भ आणि टोकदार वक्तृत्व...प्रसिद्ध लेखक आणि काँग्रेसचे खासदार शशी थरूर यांची सारी वैशिष्ट्ये जयपूर लिटरेचर फेस्टिव्हलचा आजचा दुसरा दिवस गाजवणारी ठरली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

‘हिंदुत्व चळवळीला भारतीय राज्यघटना मान्य नाही,’ असा आरोप थरूर यांनी केला. ‘भारतीय राजकारणातला ह्युमर (नर्मविनोद) हरवला आहे,’ असे सांगताना त्यांनी ‘आजच्या सरकारने महात्मा गांधींची तत्वे फेकून दिली आणि त्यांचा मौल्यवान चष्मा स्वच्छ भारत अभियानात ठेवला,’ अशी टिप्पणी केली.

Delhi Election : केजरीवाल अमित शहांना म्हणतात,' सर, मोफत चार्जिंगची सोयही केली आहे !

लंडनमधील प्रकाशक मायकेल ड्‌वायर यांनी थरूर यांना बोलते केले ‘शशी ऑन शशी’ या चर्चासत्रात. थरूर यांनी स्वतःबद्दल बोलतानाच राजकीय फटकेबाजीही जोरदार केली. ‘स्वातंत्र्यानंतरची सत्तर वर्षे एकात्मतेची होती. पहिल्यांदाच देशात असे सरकार सत्तेवर आहे, ज्याला ही संकल्पना पटत नाही,’ असा हल्लाबोल त्यांनी केंद्र सरकारवर केला. थरूर म्हणाले, ‘पंतप्रधान नरेंद्र मोदी सावरकरांचे कौतुक करतात. मात्र, याच सावरकरांनी द्विराष्ट्रवादाचे समर्थन केले होते. भारतीय राज्यघटनेचे तुकडे करा आणि फेकून द्या, असे हिंदुत्ववाद्यांचे सांगणे होते.’

राजकारणात महिलाच होतायत ट्रोल; बदनामीकारक ट्‌विटची संख्या जास्त

इकिगाई म्हणजे जगण्याचा उद्देश. जपानच्या ओकिनावा खेड्यातील नागरिकांच्या दीर्घायुष्याचे रहस्य म्हणजे ते क्षमाशील आहेत. स्वतःसाठी तासभर देतात. कृत्रिम व्यग्रतेने होणारे नुकसान टाळतात.
- फ्रान्ससिस मिरॅलिस, इकिगाई या जगभर गाजत असलेल्या पुस्तकाचे लेखक

ब्रिटनमध्ये आज विद्यार्थी आंदोलन करत आहेत. त्यांची प्रेरणा महात्मा गांधी आहेत.
- तलत अहमद, प्राध्यापक, एडिनबरो युनिव्हर्सिटी

खासगी आयुष्याची भारतीय आणि पाश्‍चिमात्य संकल्पना वेगळी आहे. खासगी डेटा आपण पाच रुपयांनाही देऊन टाकतो.
- जसप्रीतसिंग, लेखक-आंत्रप्रिन्युअर

फेसबुक अनैतिक (इमॉरल) कंपनी आहे. भारताने नाकारलेला फेसबुकचा ‘फ्री बेसिक’ प्रकल्प म्हणजे वसाहतवादाचा प्रकार होता.
- जॉन लॅंचेस्टर, लेखक-पत्रकार

loading image