मुख्य अंकासाठी (सुधारित)

मुख्य अंकासाठी (सुधारित)
Published on: 

तटकरे-पटेलांच्या भूमिकेवर
रोहित पवारांची टीका

यवतमाळ, ता. ६ : ‘‘अजितदादा हयात असते तर विलीनीकरण झालेच असते. त्यांची इच्छा संपूर्ण परिवार एकत्र राहावा, अशी भूमिका होती. मात्र, त्यांच्या निधनानंतर सुनील तटकरे आणि प्रफुल्ल पटेल यांनी विलीनीकरणाबाबत काहीही नव्हते, अशी भूमिका मांडली होती. मग आता अचानक असे काय घडले की विलीनीकरण होणार होते, असे सांगितले जात आहे? या वक्तव्यामागे संबंधित नेत्यांची राजकीय भूमिका असावी. त्यांच्या पक्षात त्यांचे चालते की नाही, हे मला माहिती नाही; मात्र राजकीय अडचणींमुळेच त्यांनी अशी वक्तव्ये केली असावीत,’’ अशी टीका आमदार रोहित पवार यांनी केला.

ते यवतमाळ दौऱ्यावर असताना माध्यमांशी बोलत होते. जिल्हा परिषद निवडणुकीत दादांनी भाजपच्या विरोधातही लढा दिला होता. त्यामुळे त्यांच्या राजकीय भूमिकेचा केवळ सत्तेच्या समीकरणातून अर्थ लावता येणार नाही. शरद पवार साहेबांना आम्ही ओळखतो. गेली ६० ते ६५ वर्षे त्यांनी प्रतिगामी विचारांविरोधात संघर्ष केला आहे. त्यामुळे अजित पवार यांचा पक्ष सत्तेत असेल तर त्यांच्यासोबत जाण्याचा प्रश्नच उद्भवत नाही. पवार साहेब असा कोणताही निर्णय घेणार नाहीत.
....................................
(चौकट)
भेटीवरून राजकारण नको
शरद पवार यांची प्रकृती ठीक नसल्याने डॉक्टरांनी त्यांना अधिक न बोलण्याचा सल्ला दिला आहे. त्यामुळे प्रफुल्ल पटेल यांच्याशी प्रकृती सुधारल्यानंतर संवाद साधू, असे त्यांनी सांगितले असावे. मात्र, भेटीचे फोटो आणि व्हिडिओ वापरून पक्षांतर्गत वेगळे राजकारण केले जात असेल, तर ते योग्य नाही. पंतप्रधानांपासून विविध पक्षांचे नेते शरद पवार यांना फोन करून प्रकृतीची विचारपूस करतात. त्यामुळे अशा भेटींमध्ये राजकीय अर्थ शोधणे योग्य ठरणार नाही, असेही रोहित पवार यांनी स्पष्ट केले.
.............................

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.