Rohit Pawar : आज आंदोलन करणारे लोक 'त्यावेळी' का शांत होते रोहित पवारांचा सवाल

राज्याच्या राज्यपालांनी छत्रपती शिवराय, महात्मा जोतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या बाबतीत खालच्या पातळीवर वक्तव्य केले
Rohit Pawar
Rohit Pawarsakal

बारामती : राज्याच्या राज्यपालांनी छत्रपती शिवराय, महात्मा जोतिराव फुले, क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यांच्या बाबतीत खालच्या पातळीवर वक्तव्य केले, तेव्हा आजचे आंदोलन करणारे लोक का शांत बसले होते, असा सवाल आमदार रोहित पवार यांनी भाजपसह शिंदे गट आणि 'मनसे'ला केला आहे.

बारामतीत माध्यमांशी ते बोलत होते. रोहित पवार म्हणाले,

जेव्हा हर हर महादेव चित्रपटात शिवरायांच्या बाबतीत खोटा इतिहास दाखविला गेला, कर्नाटकमध्ये छत्रपती शिवाजी महाराजांच्या मोठ्या पुतळ्याचा अवमान झाला. आज आंदोलन करणारे लोक त्यावेळी गप्प का बसले याचे आश्चर्य व खंत आहे.

सावरकरांच्या बाबत काही बोलणार नाही, त्यांच्याबाबतचा माझा अभ्यास खरच कच्चा आहे. अभ्यास नक्कीच करावा लागेल, मात्र,याबाबत चर्चा झाली पाहिजे. शाहु,फुले, आंबेडकरांचा कोणताही विषय आला, तरी आपण त्यांचा इतिहास माहिती असल्याने लढतो. हे लढत नाहीत, ती गोष्ट वेगळी आहे. त्यामुळे सावरकर यांच्याबाबतचा खरा इतिहास समजला पाहिजे.

राहुल गांधी यांनी दाखविलेल्या पत्रात काय लिहिले होते,सावरकर यांनी लिहिलेल्या पुस्तकातील शब्द आणि शब्द समजुन घेणे आवश्यक आहे. युवा पिढीला सावरकरांचा इतिहास समजला पाहिजे. यात राजकारण बाजुला ठेवणे आवश्यक आहे. राहुल गांधीचा विरोध कमी होत आहे. भाजप,शिंदे गट आणि मनसे यामध्ये राजकारण करीत आहेत. उध्दव ठाकरे यांच्या शिवसेनेला अडचणीत आणण्याचा प्रयत्न सुरु आहे. राजकारणाचा फायदा घेण्यासाठी थोर व्यक्तिंना राजकीय चष्म्यातून पाहता कि काय, असा प्रश्न सर्वसामान्यांना पडला असल्याचे आमदार पवार म्हणाले.

माझ्या मतदारसंघात केवळ मला श्रेय मिळु नये यासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा विकास आराखडा, राशीनच्या देवीचा आराखडा आदी धार्मिक, विविध महत्वाच्या कामांना स्थगिती देण्यात आली आहे. जामखेडच्या पिण्याच्या पाण्याच्या योजनेला विरोधकांच्या सांगण्यावरुन स्थगिती देण्यात आली आहे. सगळ्यात राजकारण पाहण्यापेक्षा लोकांचे हित पहा, लोक आता दुटप्पी राजकारण सहन करणार नाहीत, येत्या काळात लोक शांत राहणार नाहीत, असा इशाराच रोहित पवार यांनी दिला.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News
www.esakal.com