
छत्रपती संभाजीनगरमध्ये अन्याय झालेल्या महिलेला पुण्यात आश्रय दिल्यानं ३ तरुणींची कोथरूड पोलिसांनी चौकशी केली. या चौकशीवेळी त्यांना अपमानास्पद वागणूक दिली गेली. तसंच जातीवाचक शिवीगाळ करण्यात आल्याचे आरोप तरुणींनी केले आहेत. त्या तरुणींनी पोलिसांविरोधात गुन्हा दाखल करण्याची मागणी केली असता पोलिसांनी त्याला नकार दिला. तब्बल १५ तासांपेक्षा अधिक काळ आंदोलन करूनही पोलिसांनी गुन्हा दाखल करता येणार नसल्याचं लेखी लिहून दिलं आहे. आमदार रोहीत पवार, वंचित बहुजन आघाडीचे सुजात आंबेडकर यांच्यासह अनेक सामाजिक कार्यकर्ते पोलीस ठाण्यात ठाण मांडून होते.