शरद पवारांची भेट घेऊन रोहित पवार झाले थक्क! भावूक पोस्ट केली शेअर

rohit Pawar Visit Sharad Pawar shares emotional post
rohit Pawar Visit Sharad Pawar shares emotional post

पुणे : ज्येष्ठ नेते आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार यांच्यावर मुंबईतील ब्रीच कँडी रुग्णालयात यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. दरम्यान, शस्त्रक्रियेनंतर आमदार रोहित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेत त्यांच्या तब्येतीची चौकशी केली. यावेळी आरोग्यमंत्री राजेश टोपे देखील उपस्थित होते. दरम्यान, शरद पवार यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगत रोहित पवार यांनी फेसबुकवर भावूक पोस्ट शेअर केली आहे.  ''ब्रीच कँडी' हॉस्पिटलमध्ये आदरणीय शरद पवार साहेबांवर यशस्वी शस्त्रक्रिया करून पित्ताशयातील खडे काढण्यात आले. सर्वांनाच काळजी वाटत असली तरी साहेबांची प्रकृती सुधारत असून त्यांना लवकर आराम मिळेल. शस्त्रक्रिया करणारे डॉ. मायदेव आणि त्यांच्या इतर सर्व सहकाऱ्यांचे मनापासून आभार!''  अशी माहिती देऊन सर्वांचे आभार मानले.

सोमवारी शरद पवार यांच्या पोटात दुखू लागल्यानं त्यांना रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. त्यानंतर केलेल्या तपासणीमध्ये पित्ताशयाचा त्रास असल्याचं समोर आलं होतं. मंगळवारी रात्री उशिरा त्यांच्यावर शस्त्रक्रिया करण्यात आली. शस्त्रक्रिया यशस्वी झाली असून त्यांची प्रकृती स्थिर असल्याची माहिती राज्याचे आरोग्यमंत्री राजेश टोपे यांनी दिली आहे. पित्तनलिकेच्या मुखाशी असलेला खडा काढण्यात आला. पुढचे दोन ते तीन दिवस त्यांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात येणार असून त्यानंतर रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात येईल, अशी माहिती डॉक्टरांनी दिली आहे. 

...अन् थक्क झाले रोहित पवार!
आज शस्त्रक्रियेनंतर आरोग्यमंत्री राजेश टोपे यांच्यासह रोहित पवार यांनी शरद पवार यांची भेट घेतली. यावेळी आरोग्यमंत्री टोपे यांच्यांकडून इतर विषयांसह राज्यातील कोरोनाच्या स्थितीची माहिती घेतली. हा सर्व प्रकार पाहून, ''हॉस्पिटलमध्ये असतानाही राज्याची काळजी करणाऱ्या या लोकनेत्याला पाहून तर मी थक्क झालो!'' अशी भावना रोहित पवार यांनी व्यक्त केली आहे. 

शरद पवार यांची प्रकृती स्थिर
ज्येष्ठ नेते शरद पवार यांच्यावर मुंबईत यशस्वी शस्त्रक्रिया पार पडली. दुर्बिणीद्वारे त्यांची शस्त्रक्रिया झाली असून प्रकृती स्थिर आहे. त्यांना चार ते पाच दिवसांत डिस्चार्ज मिळेल. मात्र आणखी एक शस्त्रक्रिया करायची असल्यानं त्यांना पुन्हा रुग्णालयात दाखल व्हावं लागेल. पुढची शस्त्रक्रिया आठ ते दहा दिवसात करण्याचा सल्ला डॉक्टरांनी दिला असल्याचंही राजेश टोपे म्हणाले.

- पुणे शहर आणि जिल्ह्यातील बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

(Edited by: Ashish N. Kadam)

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com