
पुणे : दक्षिण आफ्रिकेतील प्रिटोरिया शहरात ऑक्टोबरमध्ये होणाऱ्या ‘जी-२०’ परिषदेच्या यूथ एंगेजमेंट प्लॅटफॉर्म (वाय-२०)च्या ‘समावेशक अर्थव्यवस्था आणि रोजगार’ या विभागाच्या अध्यक्षपदी येथील वर्ल्ड चेंबर फॉर सोशल बिझिनेसच्या देशातील अध्यक्षा रोनिता रॉय घोष यांची निवड झाली आहे. दक्षिण आफ्रिका सरकारने ‘जी-२०’ परिषदेसाठी केलेल्या नियुक्त्यांत रोनिता या एकमेव भारतीय आहेत.