गुलाबाचे भाव यंदा विक्रम गाठतील

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 24 जानेवारी 2020

हवामानातील चढउतारामुळे उत्पादन आता सुरू झाल्याने ऐन निर्यातीच्या काळात व त्यानंतर स्थानिक बाजारपेठेत फुलांचा तुटवडा निर्माण होण्याची शक्‍यता आहे. मात्र, त्यामुळे दर मात्र चांगला मिळेल.
- शिवाजी भेगडे, अध्यक्ष, पुणे जिल्हा फूल उत्पादक संघ

वडगाव मावळ - ‘व्हॅलेंटाइन डे’साठी गुलाब फुलांचे उत्पादन घेण्यासाठी मावळ तालुक्‍यातील फूल उत्पादकांची सध्या लगबग सुरू झाली आहे. यंदा लांबलेला पावसाळा, ढगाळ हवामान व गायब झालेली थंडी या कारणांमुळे उत्पादनाचे नियोजन कोलमडले आहे. त्यामुळे यंदा निर्यातक्षम उत्पादनात पंचवीस ते तीस टक्के घट होण्याची शक्‍यता आहे. त्यामुळे गुलाबाचे भाव यंदा विक्रम गाठतील, अशी शक्यता व्यक्त होत आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

फूल उत्पादनात मावळ
    मावळात सुमारे अडीच ते तीन हजार एकर क्षेत्रावर गुलाबशेती
    देशातील गुलाब फुलांच्या उत्पादनात मावळातील वाटा सत्तर टक्के
    ‘व्हॅलेंटाइन डे’साठी २५ जानेवारीपासून फुलांची निर्यात सुरू 
    ‘व्हॅलेंटाइन डे’साठीची ९ फेब्रुवारीला शेवटची निर्यात
    ओरिएन फ्लोरा, सोएक्‍स, एस.आर. या कंपन्यांकडून निर्यात

गतवर्षीची स्थिती 
    मावळातून सुमारे ७५ लाख फुलांची निर्यात
    प्रति फुलाला मिळाला सुमारे बारा रुपये दर
    थंडीचे प्रमाण अधिक राहिले
    निर्यातीसाठी मागणी असूनही पुरवठा अपुरा
    स्थानिक बाजारपेठेतही मिळाला चांगला दर 

यंदाची स्थिती
    थंडीबाबतचा अंदाज चुकल्याने नियोजन कोलमडले
    प्रतिकूल हवामानामुळे थ्रीप्स व डाऊनी किडींचा प्रादुर्भाव
    वेळोवेळी फवारणी करून गुणवत्ता टिकविण्यावर भर

फटका काय बसेल
    फुलांची साइज व स्टेम लेंग्थ कमी होण्याची शक्‍यता
    उष्ण हवामानामुळे दहा-बारा दिवस अगोदरच उत्पादन येण्यास सुरुवात
    निर्यातीत पंचवीस ते तीस टक्के घट

स्थानिक बाजारपेठा
दिल्ली, भोपाळ, जयपूर, लखनौ, इलाहाबाद, इंदोर, अहमदाबाद, कानपूर, मुंबई, पुणे, हैदराबाद, बंगलोर, चंडीगड.

येथे होते निर्यात
युरोप (सर्व देश), दुबई, जपान, इंग्लंड


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: rose rate increase for valentine day