‘रोझलॅंड’चे मॉडेल ‘आयआयटी’ राबविणार

सकाळ वृत्तसेवा
सोमवार, 3 डिसेंबर 2018

पिंपरी - घनकचरा व्यवस्थापनात स्वयंपूर्ण असणाऱ्या पिंपळे सौदागरमधील रोझलॅंड सोसायटीने तयार केलेले मॉडेल आता पवईच्या आयआयटीने राबविण्याचे ठरवले आहे. घनकचरा व्यवस्थापनासंदर्भात राबवण्यात येणाऱ्या योजनांची माहिती घेण्यासाठी आयआयटीमध्ये कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. या कार्यक्रमाला सामाजिक संस्था, सरकारी अधिकारी, निवडक सोसायट्यांच्या पदाधिकाऱ्यांना निमंत्रित करण्यात आले होते. 

पिंपळे सौदागरमधील रोझलॅंड सोसायटीला या कार्यक्रमासाठी बोलविण्यात आले होते. सोसायटीमध्ये जमा होणाऱ्या कचऱ्याचा निचरा त्याच ठिकाणी करण्यासाठी तयार केलेल्या मॉडेलची सविस्तर माहिती या वेळी देण्यात आली. रेनवॉटर हार्वेस्टिंग, वृक्षारोपण, पाणी आणि वीज व्यवस्थापन, पक्षी संवर्धनासाठी राबविण्यात येणारे उपक्रम, ज्येष्ठ नागरिकांसाठी सुरू करण्यात आलेला ग्रंथालयाचा उपक्रम, याची माहिती आयआयटीमध्ये देण्यात आली. 

दरम्यान, काही दिवसांपूर्वी आयआयटीमधील काही अधिकाऱ्यांनी रोझलॅंड सोसायटीला भेट देऊन या ठिकाणी राबविण्यात येणाऱ्या उपक्रमांची पाहणी केली होती. पिंपळे सौदागर परिसरातील कुणाल आयकॉन सोसायटीमध्ये कचऱ्यातून खतनिर्मितीसाठी राबवण्यात येणाऱ्या प्रकल्पाची माहिती आयआयटीला देण्यात आली. या उपक्रमासाठी राबविण्यात आलेले तंत्रज्ञान त्यांना सांगण्यात आल्याचे सोसायटीचे अध्यक्ष विनोद सुर्वे यांनी सांगितले.

Web Title: Roseland Model IIT garbage Management