helicopter
sakal
- प्रसाद कानडे
पुणे, - पुणे-मुंबई-पुणे हेलिकॉप्टर प्रवासाचा कालावधी हा आठ ते १२ मिनिटांनी वाढणार आहे. येत्या २४ डिसेंबरपासून पुणे-मुंबई हेलिकॉप्टरच्या सध्याच्या मार्गात बदल होत आहे. नवीन मार्ग हा आताच्या मार्गापासून काहीसा दूरचा असल्याने परिणामी प्रवासाचा वेळ वाढणार आहे. बदललेल्या मार्गाचा प्रवास शुल्कावर परिणाम होईल का, हे अद्याप स्पष्ट झालेले नाही.