...म्हणून हडपसरमध्ये आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी काढला मोर्चा

सकाळ वृत्तसेवा
Tuesday, 15 September 2020

वैभव थिअटर शेजारील एका हॅाटेल समोर पार्सल घेण्यासाठी थांबलेल्या आरपीआय कामगार आघाडीचे पुणे शहर अध्यक्ष रामभाउ कर्वे यांनी मास्क घातला नाही, म्हणून पोलिसांनी त्यांना मारहाण केल्याचा प्रकार घडला. त्यामुळे आरपीआयच्यावतीने हडपसर पोलिस ठाण्यावरती पोलिसांचा निषेध करत मोर्चा काढला व संबधित पोलिसांची बदली करण्याची मागणी केली.

हडपसर (पुणे) : वैभव थिअटर शेजारील एका हॅाटेल समोर पार्सल घेण्यासाठी थांबलेल्या आरपीआय कामगार आघाडीचे पुणे शहर अध्यक्ष रामभाऊ कर्वे यांनी मास्क घातला नाही, म्हणून पोलिसांनी त्यांना मारहाण केल्याचा प्रकार घडला. त्यामुळे आरपीआयच्यावतीने हडपसर पोलिस ठाण्यावरती पोलिसांचा निषेध करत मोर्चा काढला व संबधित पोलिसांची बदली करण्याची मागणी केली.

पुण्याच्या बातम्या वाचण्यासाठी येथे ► क्लिक करा

पोलिसांनी मास्क न घातल्याने नियमानुसार कारवाई करणे अपेक्षित होते. मात्र मारहाण केली. त्यामुळे आरपीआयच्या कार्यकर्त्यांनी मोर्चा काढला. एकीकडे हडपसर पोलिस ठाण्याच्या हद्दीतील कायदा व सुव्यवस्थेचा प्रश्न गंभीर बनला आहे. अवैध धंदे वाढले आहेत. त्याकडे पोलिस अर्थपूर्ण संबध असल्याने दुर्लक्ष करत असल्याची तक्रार यावेळी आंदोलन कर्त्यांनी केली.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

यावेळी आरपीआयच्या महिला शहराध्यक्षा शशिकला वाघमारे, हडपसर विधानसभा अध्यक्ष संतोष खरात महादेव कांबळे, गौतम वानखेडे, विक्रम आल्हाट, आशिष अल्हाट, प्रदीप कांबळे, गजेंद्र मोरे, मीनाताई गालटे, सुखदेव कांबळे उपस्थित होते. यावेळी हडपसर पोलिस ठाण्याचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक रमेश साठे यांनी या प्रकरणाची चौकशी करून योग्य ती कारवाई केली जाईल, असे अश्वासन दिले. त्यांनतर मोर्चा मागे घेण्यात आला. 


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RPI activists staged a protest in Hadapsar