
''दिवसभर कवितेचा छंद जोपासणाऱ्यांनी शेती कशी करायची हे शिकून घ्यावे, र ला र आणि ट ला ट जोडून चार ओळी कविता करून स्टंट करणाऱ्यांना शेतकरी आंदोलन स्टंटच वाटणार'' अशी टीका रुपाली चाकणकर यांनी रामदास आठवले यांच्यावर केली होती.
पुणे : राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला प्रदेशाध्यक्ष रूपाली चाकणकर यांनी केंद्रीय मंत्री रामदास आठवले यांच्याबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याने पुणे शहर आर पी आय महिला आघाडीच्या वतीने आज चाकणकार यांच्या घरावर मोर्चा काढण्यात आला.
हे वाचा - 'तुम्हाला जिवंत सोडत नाही'; जमीन वाटपाच्या रागातून इंदापुरात महिलेचा खून!
''दिवसभर कवितेचा छंद जोपासणाऱ्यांनी शेती कशी करायची हे शिकून घ्यावे, र ला र आणि ट ला ट जोडून चार ओळी कविता करून स्टंट करणाऱ्यांना शेतकरी आंदोलन स्टंटच वाटणार'' अशी टीका रुपाली चाकणकर यांनी रामदास आठवले यांच्यावर केली होती. चाकणकर यांच्या वक्तव्याच्या विरोधात आज आरपीआयने मोर्चा काढला.
पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
यावेळी महिला कार्यकर्त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलंय, या पार्श्वभूमीवर चाकणकर यांच्या पुण्यातील धायरी येथील घराभोवती पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला आहे. यावेळी रामदास आठवले समर्थक यांना रस्त्यावर अडविण्यात आले व त्यांना सिंहगड रस्ता पोलिसांनी अनेक महिला कार्येकर्त्यांना अटक करून पोलिस व्हॅन मध्ये घेऊन जाण्यात आले आहे.