
सचिन साहेबराव भोसले व त्यांची पत्नी शिवानी हे दोघे शेतातून मोटरसायकलवरून घरी परतले असता आरोपी स्वप्नील उर्फ योगेश भोसले, विठ्ठल भोसले, लक्ष्मी भोसले हे तिघे शिवीगाळ घरात घुसले.
इंदापूर : जमीन वाटपाच्या कारणावरून पंचावन्न वर्षीय महिलेच्या डोक्यात कुऱ्हाडीने घाव घालून इंदापूर तालुक्यातील काटी गावी २४ जानेवारी रोजी सायंकाळी सहा वाजता खून करण्यात आला.
आशाबाई साहेबराव भोसले ( वय ५५ वर्षे रा.बिजलीनगर, काटी ता. इंदापूर जि. पुणे) असे मयत महिलेचे नाव आहे. मयतेचा मुलगा सचिन साहेबराव भोसले यांनी इंदापूर पोलिस ठाण्यातदिलेल्या फिर्यादीनुसार स्वप्नील उर्फ योगेश विठ्ठल भोसले, विठ्ठल महादेव भोसले, लक्ष्मी विठ्ठल भोसले ( सर्व रा. काटी ता. इंदापूर जि. पुणे) यांच्यावर इंदापूर पोलिस ठाण्यात गुन्हा नोंदविण्यात आला आहे.
Farmer Protest : अमेरिकेत भारतीय दुतावासाबाहेर फडकावले खलिस्तानी झेंडे
सचिन साहेबराव भोसले व त्यांची पत्नी शिवानी हे दोघे शेतातून मोटरसायकलवरून घरी परतले असता आरोपी स्वप्नील उर्फ योगेश भोसले, विठ्ठल भोसले, लक्ष्मी भोसले हे तिघे शिवीगाळ घरात घुसले. जमीन गट नं. ८७७ ( नवीन ) मध्ये झालेल्या जमीनीचे भांडण तसेच जुन्या जमीन वाटपाच्या कारणावरुन हा वाद सुरु होता. यावेळी स्वप्निल भोसले याच्या हातात कुऱ्हाड, विठ्ठल भोसले यांच्या हातात काठी होती.
IMF ची भारतीय अर्थव्यवस्थेसाठी 'गुड न्यूज', चीनलाही टाकणार मागे
स्वप्निल याने ''तुम्ही आम्हाला जमीन दिली नाही, तुम्हाला आता जिवंत सोडत नाही''असे म्हणत हातातील कुर्हाडीने फिर्यादीची आई आशाबाई हिच्या डोक्यात घाव घातला. विठ्ठल याने त्याच्या हातातील काठीने आई आशाबाई व पत्नी शिवानी यांना मारहाण केली तर लक्ष्मी भोसले हिने कुटुंबीयांना दगड फेकुन मारले. सदर भांडणामध्ये आशाबाई यांच्या डोक्यास वर्मी घाव बसून त्या गंभीररीत्या जखमी झाल्याने त्यांचा मृत्यू झाला. पुढील तपास इंदापूर पोलीस निरीक्षकनारायण सारंगकर करत आहेत.