पुणे : कर्ज मंजुरी व नोकरीच्या आमिषाने दोघांची 17 लाखांची फसवणूक

सकाळ वृत्तसेवा
शुक्रवार, 17 जानेवारी 2020

कर्ज मंजुरी व नोकरीच्या आमिषाने दोघांची 17 लाखांची फसवणूक 
ऑनलाईन फसवणूकीचे प्रकार थांबेना 

पुणे : पंतप्रधान मुद्रा योजनेतून पन्नास लाख रुपयांचे कर्ज मंजूर करण्याच्या बहाण्याने एका नागरीकाची अनोळखी व्यक्तींनी आठ लाख रुपयांची फसवणूक केली. तर दुसऱ्या घटनेमध्ये नामांकीत कंपनीत नोकरीचे आमिष दाखवून एका महिलेस पावणे नऊ लाखांची फसविण्यात आले. दोन्ही घटनांमध्ये ऑनलाईन पद्धतीने फसवणूक करण्यात आली याप्रकरणी मार्केटयार्ड व विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनांमुळे ऑनलाईन फसवणूकीच्या घटना थांबत नसल्याची सद्यस्थिती आहे.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

कर्जमंजुरीप्रकरणी सुभाष शंकरलाल जैन (वय 65, रा. गंगाधाम, मार्केटयार्ड) यांनी मार्केटयार्ड पोलीस ठाण्यात फिर्याद दिली आहे. पोलिसांनी दिलेल्या माहितीनुसार, फिर्यादी जैन यांनी व्यावसायाच्या हेतुने पंतप्रधान मुद्रा योजनेतून पन्नास लाख रुपयांचे कर्जासाठी ऑनलाइन अर्ज सादर केला होता. त्यानंतर अनोळखी व्यक्तींनी त्यांच्याशी संपर्क साधून त्यांना एक इमेल पाठवून पन्नास लाख रुपयांचे कर्ज मंजूर झाल्याचे सांगितले. फिर्यादी यांनी त्याच्यावर विश्‍वास ठेवला. त्यानंतर त्याने फिर्यादी यांना कर्ज मिळण्यापुर्वी ठराविक रक्कम भरावी लागेल असे सांगितले. त्यानुसार, त्याने वेगवेगळी बॅंक खात्याचा क्रमांक देऊन फिर्यादी यांच्याकडून सात लाख 81 हजार 913 रुपये इतकी रक्कम वेळोवेळी घेतली. त्यानंतर फिर्यादी यांनी त्याच्याकडे कर्ज मिळण्यासाठी पाठपुरावा केला. मात्र त्यांच्याकडून प्रतिसाद मिळाला नाही. आपली फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणाचा तपास वरिष्ठ पोलीस निरीक्षक संभाजी निंबाळकर करीत आहेत. 

Video : तेव्हा सांगली बंदचे आवाहन केले असते तर बरे झाले असते : खा. कोल्हे

दुसऱ्या घटनेमध्ये धानोरीतील25 वर्षीय महिलेने विश्रांतवाडी पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. फिर्यादी महिला नोकरीचा शोध घेत होती. त्यासाठी त्यांनी विविध ठिकाणी अर्ज केले होते. त्यानुसार त्यांना एका अनोळखी व्यक्तीने संपर्क केला. त्यांना नामांकीत कंपनीत नोकरीची संधी असल्याचे आमिष दाखविण्यात आले. मात्र त्यासाठी फिर्यादीला ठराविक रक्कम भरण्यास सांगितले. त्यानुसार फिर्यादींनी वेळोवेळी संबंधीत व्यक्तीने सांगितलेल्या बॅंक खात्यावर आठ लाख 79 हजार 887 रुपयये भरले. त्यानंतर नोकरीसाठी तिने संपर्क साधला. त्यावेळी संबंधीत मोबाईल क्रमांक बंद लागला. फसवणूक झाल्याचे लक्षात आल्यानंतर त्यांनी पोलिसांकडे धाव घेतली. या प्रकरणाचा तपास गुन्हे शाखेचे पोलीस निरीक्षक रवींद्र कदम तपास करत आहेत.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: Rs 17 lakh fraud on loan sanction in Pune

टॅग्स
टॉपिकस
Topic Tags: