राष्ट्रीय स्वयंसवेक संघ संचलन

राष्ट्रीय स्वयंसवेक संघ संचलन
Published on: 

PNE26W59422 - संग्रहित छायाचित्र

संघाच्या शताब्दी वर्षाची
संचलनाने होणार सांगता

सोलापूरच्या १६ नगरांत विजयादशमी उत्सव

सकाळ वृत्तसेवा
सोलापूर, ता. १७ : घोषपथकाचा निनाद, हातात दंड आणि पावलांमध्ये शिस्त अशा वातावरणात राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाची सांगता संचलनाने होणार आहे. दरवर्षीच्या परंपरेनुसार विजयादशमीनिमित्त सोलापूर शहरात या संचलन होणार आहेत. संघदृष्ट्या असलेल्या १६ नगरांमध्ये जवळपास चार हजार स्वयंसेवक सहभागी होणार आहेत. काही नगरांमध्ये रविवारी १८ ऑक्टोबरला, तर काही नगरांमध्ये मंगळवारी सकाळी संचलन होईल. वर्षभर राबविलेल्या पंचपरिवर्तनाच्या कार्याचा शताब्दी वर्षाच्या समारोपानिमित्त आढावा घेतला जाणार असला, तरी हे कार्य यापुढेही नियमितपणे सुरू राहणार आहे.
आण्णाभाऊ साठे नगर, मल्लिकार्जुन नगर, भवानी नगर, विक्रमादित्य नगर, दयानंद नगर, केशव नगर, पंचमूर्ती नगर, संभाजी नगर, श्रीराम नगर, शिवाजी नगर, माधव नगर, भावनाऋषी नगर, हनुमान नगर, अशोक नगर, रेवणसिद्धेश्वर नगर, भगतसिंग नगर या नगरांमध्ये संचलन काढण्यात येणारी आहेत.

---------------------
संचलन एका नजरेत
आयोजन : राष्ट्रीय स्वयंसेवक संघ, सोलापूर
निमित्त : संघाचे शताब्दी वर्ष आणि विजयादशमी उत्सव
व्याप्ती : शहरातील संघदृष्ट्या असलेली १६ नगरे
सहभाग : जवळपास चार हजार स्वयंसेवक
वेळापत्रक : काही नगरांत आज; तर काही नगरांत मंगळवारी सकाळी

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates, मराठी ताज्या बातम्या, मराठी ब्रेकिंग न्यूज, मराठी ताज्या घडामोडी. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Marathi News Esakal
www.esakal.com