
"RSS Prayer Now in 8 Languages: A Century of Inspiration"
esakal
पुणे : राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या शताब्दी वर्षाचे औचित्य साधत आता संघ प्रार्थना विविध भाषांमध्ये नागरिकांना समजून घेता येणार आहे. निमित्त आहे, पुण्यातील शिवाजीनगर विधानसभा मतदार संघाचे आमदार सिद्धार्थ शिरोळे आणि चितळे समूहाचे संचालक इंद्रनील चितळे यांची निर्मिती असलेल्या ‘अर्थासहित संघ प्रार्थना’ या विशेष प्रकल्पाच्या विमोचनाचे.