

RTE 25 Percent Admission Process Begins
पुणे : शिक्षण हक्क कायद्यानुसार (आरटीई) आर्थिकदृष्ट्या दुर्बल आणि वंचित घटकातील विद्यार्थ्यांना खासगी शाळांमध्ये २५ टक्के राखीव जागांवर २०२६-२७ या शैक्षणिक वर्षासाठीच्या प्रवेश प्रक्रियेचा पहिला टप्पा शुक्रवारपासून (ता. ९) सुरू होत आहे. आरटीई २५ टक्के राखीव जागांवरील प्रवेश प्रक्रिया सुरु करण्याच्या अनुषंगाने शुक्रवारपासून विनाअनुदानित आणि स्वयंअर्थसहाय्यित शाळा नोंदणी आणि शाळा पडताळणीची लिंक सुरु करण्यात येणार आहे.