पुणे: शालेय शिक्षण विभागाने आरटीई (शिक्षणाचा अधिकार कायदा) अंतर्गत मोफत व सक्तीच्या शिक्षणासाठीच्या प्रवेश प्रक्रियेस १ एप्रिलपर्यंत मुदतवाढ दिली आहे. याआधी प्रवेशासाठी १० मार्च अंतिम तारीख होती, मात्र प्रतीक्षा यादीतील विद्यार्थ्यांसाठी ही संधी वाढवण्यात आली आहे.