आरटीई प्रवेश प्रक्रियेला प्रारंभीच ग्रहण

सकाळ वृत्तसेवा
गुरुवार, 13 फेब्रुवारी 2020

आरटीईअंतर्गत ऑनलाइन प्रवेश अर्ज करण्याची प्रक्रिया बुधवारपासून (ता. १२) सुरू झाली. मात्र, पहिल्याच दिवशी पालकांना अडचणींचा सामना करावा लागला. आरटीईचे संकेतस्थळ वेळेत सुरू न झाल्यामुळे पालकांना अर्ज भरता आले नाहीत. ही प्रक्रिया २९ फेब्रुवारीपर्यंत सुरू असेल.

पिंपरी - आरटीईअंतर्गत ऑनलाइन प्रवेश अर्ज करण्याची प्रक्रिया बुधवारपासून (ता. १२) सुरू झाली. मात्र, पहिल्याच दिवशी पालकांना अडचणींचा सामना करावा लागला. आरटीईचे संकेतस्थळ वेळेत सुरू न झाल्यामुळे पालकांना अर्ज भरता आले नाहीत. ही प्रक्रिया २९ फेब्रुवारीपर्यंत सुरू असेल.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

अर्ज भरण्यासाठी सकाळपासून पालकांनी मुलांसह सायबर कॅफेमध्ये गर्दी केली होती. त्यासाठी काहींनी सूची घेतली होती. मात्र, संकेतस्थळ सुरू होत नसल्यामुळे अर्ज भरता आला नाही. त्यामुळे पालक संतप्त झाले. अर्ज भरण्यासाठी महापालिकेने मदत केंद्रांची नावे जाहीर केली नाहीत. त्यामुळे अनेक नवीन पालकांची गैरसोय झाली. ठरलेल्या वेळेनंतर दीड तासाने संकेतस्थळ सुरू झाले. त्यातही अर्जाच्या ‘डिस्ट्रिक्‍ट कॉलम’मध्ये ‘पुणे’ जिल्ह्याचे नावच नसल्याने पालक गोंधळून गेले. 

‘‘वेळापत्रक जाहीर करण्यापासून ते शाळा नोंदणी ही प्रक्रिया पूर्ण विसंगत आहे. ती सुरळीत होण्यासाठी प्रयत्न दिसत नाहीत. यंदाही पहिल्या दिवसापासून विघ्न सुरू झाले आहे. याबाबत कोणतीही ठोस उपाययोजना न करता आरटीईकडून पालकांची थट्टा केली जात आहे,’’ अशी खंत पालक शरण शिंगे यांनी व्यक्त केली.

‘‘सरकारला जर मुदतीत प्रवेश अर्ज भरू द्यायचे नाहीत, तर वेळापत्रकात तसे जाहीर केले जाते. एकाही पालकाला नोंदणी करता आली नाही. आधीच प्रवेशप्रक्रियेला उशीर होत असल्याने पाल्याचा प्रवेश होईल की नाही, याबाबत चिंता लागली आहे,’’ असे मत आरटीई पालक संघाचे अध्यक्ष हेमंत मोरे यांनी व्यक्त केले.


स्पष्ट, नेमक्या आणि विश्वासार्ह बातम्या वाचण्यासाठी 'सकाळ'चे मोबाईल अॅप डाऊनलोड करा
Web Title: RTE Admission Process Issue