

RTE Admission Rule Put on Hold by Nagpur Bench; Fresh Application Opportunity for Parents
sakal
पुणे : ‘आरटीई’अंतर्गत खासगी शाळांमधील २५ टक्के राखीव जागांसाठीच्या प्रवेशप्रक्रियेत लागू केलेली घरापासून एक किलोमीटर अंतरातील शाळांपुरती मर्यादा उच्च न्यायालयाने स्थगित केली आहे. मुंबई उच्च न्यायालयाच्या नागपूर खंडपीठाने या अटीवर आक्षेप घेत राज्य सरकारला सुधारित प्रक्रिया राबविण्याचे निर्देश दिले आहेत. यामुळे आता पालकांना पुन्हा अर्ज करण्याची संधी मिळणार असून, प्रवेश प्रक्रियेस मुदतवाढ दिली आहे.