Pune News: पुणे ‘आरटीओ’त लाचखोरीचा ‘कळस’; वाहननिरीक्षकाची तक्रार, पदोन्नतीला ‘ब्रेक’ची शक्यता, त्या’ बड्या धेंडांवर कारवाई होणार का?

latest news on RTO corruption investigationछ आरटीओतील बेकायदा पदोन्नती प्रकरणात दीड कोटींच्या लाचखोरीचे धक्कादायक आरोप; मोटार वाहन निरीक्षकाची पुराव्यासह तक्रार, लाचलुचपत विभागाकडून तपासाला सुरुवात
Corruption Allegations Rock RTO, Big Officials Under Scanner

Corruption Allegations Rock RTO, Big Officials Under Scanner

sakal

Updated on

-प्रसाद कानडे

पुणे: प्रादेशिक परिवहन विभागातील अधिकाऱ्यांच्या बेकायदा पदोन्नतीच्या प्रकारात आता लाचखोरी समोर आली आहे. परिवहन आयुक्त कार्यालयातील एका बड्या अधिकाऱ्याने विविध प्रकारचे गुन्हे दाखल असलेल्या तीन अधिकाऱ्यांचे बनावट रेकॉर्ड तयार करून शासनाची फसवणूक केली आहे. या बदल्यात त्या अधिकाऱ्याला दीड कोटी रुपयांचा ‘नजराणा’ सादर झाला, असा आरोप मोटार वाहन निरीक्षक गजेंद्र पाटील यांनी केला असून, त्यांनी याची तक्रार पुराव्यांसह लाचलुचपत विभागाच्या पोलिस महासंचालकांकडे केली आहे. त्यांनी याची गंभीर दखल घेतली असून, प्रकरणाचा तपास करण्याचे आदेश विभागाला दिले आहेत. या तक्रारीची प्रत ‘सकाळ’च्या हाती लागली.

Loading content, please wait...

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com