
कोरोना विषाणूची साखळी खंडीत करण्यासाठी चाचण्यांचा वेग वाढविणे गरजेचे आहे. नागरिकांनीही कोरोना चाचणीचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राज्य सरकारनेही ३१ मार्चला कोरोना चाचणीचे दर कमी केलयाचे जाहीर केले होते.
Sakal Special Report : पुण्यात RTPCR, Rapid Antigen साठी खासगी लॅबमध्ये लूट
पुणे : राज्यात कोरोना रुग्णांची वाढती संख्या बघता काही दिवसांपूर्वीच राज्य सरकारने कोरोना चाचणीचे दर कमी केले आहे. आरटीपीसीआर आणि रॅपिड अँटिजेन चाचणीसाठी अनुक्रमे 500 आणि 150 असा दर निश्चित करण्यात आला आहे. मात्र शहरातील काही खाजगी प्रयोगशाळा, कोरोना सेंटर व रुग्णालयांमध्ये रॅपिड अँटिजिन टेस्टसाठी नागरिकांना 150 ते 500 रुपये तसेच आरटीपीसीआर चाचणीसाठी 600 ते एक हजार रुपये मोजावे लागत आहे. यासाठी सकाळद्वारे शहरातील विविध खाजगी चाचणी प्रयोगशाळा आणि रुग्णालयांशी संपर्क साधण्यात आला होता.
कोरोना विषाणूची साखळी खंडीत करण्यासाठी चाचण्यांचा वेग वाढविणे गरजेचे आहे. नागरिकांनीही कोरोना चाचणीचे प्रमाण वाढल्याचे दिसून येत आहे. त्यामुळे राज्य सरकारनेही ३१ मार्चला कोरोना चाचणीचे दर कमी केलयाचे जाहीर केले होते. यामुळे चाचणी करण्यासाठी नागरिकांना देखील आर्थिक अडचणींचा सामना करावा लागणार नाही. तर तपासणीसाठी नमुने कश्या प्रकारे गोळा करण्यात येत आहे. त्यानुसार विविध शुल्क आकारले जात आहेत. मात्र या दरांची अंमलबजावणी पूर्णपणे झाल्याचे दिसून येत नाही. गेल्या वर्षी राज्यात कोरोनाची सुरवात झाली तेव्हा आरटीपीसीआरसाठी साडेचार हजार रुपये घेतले जात होते. त्यानंतर सातत्याने कोरोना चाचणीचे दर कमी करण्यात आले आहे. तर आता ते 500 रुपये करण्यात आले आहे.
पुण्यातील इतर बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
आरटीपीसीआरचे नवे दर
संकलन केंद्रावर नमुने देण्यात आल्यास : 500
कोविड सेंटर, रुग्णालय, क्वारंटाईन सेंटर : 600
नागरिकांच्या घरी जाऊन नमुने घेतल्यास : 800
सुधारित दर आकारणी (सर्व करांसाहित रुपयात)
सार्स कोविड 19 साठी रॅपिड अँटिजिन टेस्ट :
1) रुग्ण स्वतः तपासणीसाठी प्रयोगशाळेत आल्यास : 150
2) तपासणी केंद्रावरून आठ एकत्रित तपासणी नमुने घेतल्यास : 200
3) रुग्णाच्या घरीजवून तपासणीसाठी नमुने घेतल्यास : 300
दिवसभरातील मुख्य बातम्या वाचण्यासाठी क्लिक करा
"सध्या राज्य सरकारने कोरोना चाचणीचे दर कमी केले आहेत. दोन दिवसा पूर्वी एका खाजगी रुग्णालयात माझा पत्नीची आरटीपीसीआर चाचणी केली आहे. त्यासाठी 800 रुपये घेण्यात आले. ती पॉझिटिव्ह असल्यामुळे आम्ही त्वरित तपासणीसाठी जवळच्या खाजगी प्रयोगशाळेत गेलो. मात्र तिथे हजार रुपये प्रति व्यक्ती असे दर आम्हाला लावण्यात आले. बऱ्याच लोकांना दर कमी झाल्याचे माहिती नसल्याने सामान्य नागरिकांकडून जास्त पैसे घेतले जाऊ शकतात."
- अमोल यादव