पुणे स्मार्ट सिटीच्या नशिबी पुन्हा प्रभारीच 'सीईओ; डॉ. संजय कोलते यांच्याकडे अतिरिक्त कार्यभार

Rubel Agarwal removed as CEO of Pune Smart City and Additional charge han over to dr. Sanjay Kolte
Rubel Agarwal removed as CEO of Pune Smart City and Additional charge han over to dr. Sanjay Kolte
Updated on

पुणे : पुणे  स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी अधिकारी असलेल्या रुबल अग्रवाल यांची बदली झालेली आहे. स्मार्ट सिटीचा अतिरिक्त कार्यभार संजय कोलते यांच्याकडे सोपविण्यात आला आहे. राज्य सरकारने कोलते यांची नियुक्ती पुण्यातील झोपडपट्टी पुनर्वसन प्राधिकरणाचे (एसआरए) मुख्य कार्यकारी अधिकारी पदावर नियुक्ती केली आहे. मात्र, स्मार्ट सिटीला पुन्हा प्रभारीच अधिकारी अधिकारी मिळाले आहेत.

ताज्या बातम्यांसाठी डाऊनलोड करा ई-सकाळचे ऍप

राज्य शासनाने काही प्रशासकीय अधिकाऱ्यांच्या बदल्या मंगळवारी केल्या. त्यात 'एसआरए'च्या मुख्य कार्यकारी अधिकारी राजेंद्र निंबाळकर यांची बदली करण्यात आली असून त्यांच्या जागी डॉ. कोलते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. निंबाळकर यांना वेटिंगवर ठेवण्यात आले आहे.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते २५ जून २०१६ रोजी १४ प्रकल्पांसह स्मार्ट सिटीचे पुण्यात उदघाटन झाले होते. स्मार्ट सिटीला केंद्र सरकारकडून दरवर्षी 100 कोटी, राज्य सरकारकडून 50 कोटी आणि पुणे महापालिकेकडून 50 कोटी रुपये दिले जातात. देशात दुसऱ्या क्रमांकाने निवड झालेल्या पुणे स्मार्ट सिटीची सातत्याने घसरण होत असून काही दिवसांपूर्वी रँकिंग मध्ये पुणे 28 व्या क्रमांकावर होती.  

जगभरातील इतर बातम्या वाचण्यासाठी येथे क्लिक करा

नियोजन आणि नव्या प्रकल्पांचा अभाव यामुळे हे मानांकन घसरल्याचे कारण केंद्र सरकारने दिले होते. त्यानंतर पुणे स्मार्ट सिटीने माहिती अपडेट केल्यावर १५ स्थान मिळाले. स्मार्ट सिटी प्रकल्पात महाराष्ट्रात पुणे, नागपूर, नाशिक, सोलापूर, ठाणे, पिंपरी चिंचवड, कल्याण - डोंबिवली आणि औरंगाबाद आदी शहरांचा समावेश आहे.  पुण्यात बदलून आलेले डॉ. कोलते हे मुळचे जळगावचे असून ते १९९४ च्या तुकडीचे भारतीय प्रशासकीय सेवेतील  अधिकारी आहेत. सध्या ते उस्मानाबाद जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यकारी अधिकारी या पदावर होते.

सकाळ+ चे सदस्य व्हा

ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.

Related Stories

No stories found.
Marathi News Esakal
www.esakal.com