

Tensions Flare in Pune Civic House as Bopodi Dargah Row Overshadows Water Scarcity Concerns
sakal
पुणे: शहरातील भीषण पाणीटंचाईवर चर्चा करण्यासाठी बोलावलेली महापालिकेची सर्वसाधारण सभा बुधवारी (ता. १७) सत्ताधारी आणि विरोधकांच्या राड्यामुळे तहकूब करण्यात आली. राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे नगरसेवक गफूर पठाण यांनी बोपोडी दर्ग्यावरील कारवाईचा मुद्दा उपस्थित केल्याने भाजप नगरसेवक आक्रमक झाले. या गोंधळामुळे ६० लाख पुणेकरांच्या जिव्हाळ्याचा पाण्याचा प्रश्न अनुत्तरीत राहिला.