पुणे - पुणे महापालिकेच्या प्रारूप प्रभाग रचना तयार करून ती राज्य सरकारला सादर करण्याची मुदत जवळ आलेली असताना राजकीय पुढार्यांची धाकधूक वाढलेली आहे. स्वतःच्या सोयीची अशी प्रभाव रचना व्हावी यासाठी उच्च पातळीवरून खटाटोप सुरू आहेत..विकास कामांच्या बैठकांच्या निमित्ताने प्रभाग रचनेवर चर्चा करण्याचा घाट घातला जात आहे. आज (३१) भाजपचे आमदार व पदाधिकाऱ्यांची आयुक्तांसोबत बैठक झाली, तर महाविकास आघाडीचे पदाधिकारी उद्या (ता. १) आयुक्तांची भेट घेणार आहेत.पुणे महापालिकेच्या निवडणुकीसाठी प्रशासनातर्फे प्रारूप प्रभाग रचना तयार करण्याचे काम सुरू आहे. चार ऑगस्टपर्यंत हे प्रारूप प्रभाग रचना राज्याच्या नगरविकास विभागाकडे सादर केली जाणार आहे. शेवटचे दोन ते तीन दिवस महापालिका प्रशासनाच्या हातामध्ये असल्याने प्रभाग रचना अंतिम करताना तांत्रिक बाबी तपासण्याचे काम प्रशासनाकडून सुरू आहे..त्याच वेळेला पुणे शहरातील विविध भागात सोयीचे प्रभाग करून घेण्यासाठी सत्ताधाऱ्यांची धडपड सुरू आहे. यामध्ये पर्वती, पुणे कॅन्टोन्मेंट आणि कसबा या तीन मतदारसंघात तीन प्रभाग हे तीन सदस्यांचे केले जाणार आहेत. त्याचा फायदा सत्ताधारी भाजपच्या प्रमुख पदाधिकाऱ्यांना होणार आहे. हे प्रमुख पदाधिकारी भाजपचे आगामी महापौर पदाचे उमेदवार असण्याची शक्यता वर्तवली जात आहे. याच भागात काँग्रेसला फटका बसण्याची शक्यता आहे..पुणे महापालिकेत आज उच्च व तंत्र शिक्षण मंत्री चंद्रकांत पाटील, आमदार भीमराव तापकीर, सिद्धार्थ शिरोळे, माजी सभागृह नेते गणेश बिडकर यांनी महापालिका आयुक्तांची भेट घेतली. जवळपास तासभर त्यांची आयुक्तांसोबत चर्चा झाली. ही बैठक झाल्यानंतर पुन्हा एकदा बिडकर, आयुक्त आणि अतिरिक्त आयुक्त ओमप्रकाश दिवटे यांच्यामध्ये देखील काही मिनिटांची बैठक पार पडली. दरम्यान बैठकीनंतर चंद्रकांत पाटील यांनी माध्यमांशी बोलण्यास नकार दिला..प्रभाग रचना अंतिम होण्यास काही दिवस शिल्लक असताना ही बैठक महत्त्वपूर्ण मानली जात आहे.आयुक्त नवल किशोर राम म्हणाले,"आजच्या बैठकीत शहरातील काही महत्त्वाचे विशेष चर्चेली गेलेले आहेत. प्रभाग रचनेचे काम अंतिम टप्प्यात आहे योग्य वेळेत आम्ही शासनाकडे सादर करू.".नाना भानगिरे ताटकळलेमहायुती मधील घटक पक्ष असलेल्या शिवसेनेचे शहरप्रमुख नाना भानगिरे हे आयुक्तांचे भेट घेण्यासाठी महापालिकेत आले होते. पण भाजपच्या नेत्यांची बराच वेळ बैठक सुरू असल्यामुळे त्यांना आयुक्तांची भेट घेतली नाही. भानगिरे हे कार्यालयात बसून होते.दरम्यान, ही बैठक संपल्यानंतर आयुक्त महत्त्वाच्या कामासाठी म्हणून महापालिकेतून बाहेर पडले. याची माहिती भानगिरे यांना मिळाली नसल्यामुळे त्यांची चुकामुक झाली. जवळपास दीड ते दोन तास भानगिरे यांना ताटकळत थांबावे लागले. प्रभाग राज्याच्या संदर्भात आयुक्तांची भेट घेण्यासाठी आलो होतो पण त्यांची भेट झाली नाही असे भानगिरे यांनी सांगितले..महाविकास आघाडी भेट घेणारप्रभाग रचनेच्या संदर्भाने सुरू असलेल्या चर्चेवरून महाविकास आघाडीमध्ये अस्वस्थता निर्माण झालेली आहे. त्यामुळे महाविकास आघाडीचे पदाधिकारी आज आयुक्तांची भेट घेऊन त्यांचे म्हणणे मांडणार होते. पण त्यांना दिवसभरात आयुक्तांची भेट मिळाली नाही. काँग्रेसचे शहराध्यक्ष अरविंद शिंदे म्हणाले,"प्रभाग रचनेसंदर्भात आम्ही आज आयुक्तांची भेट घेणार होतो.यासाठी प्रशांत जगताप यांनी वेळ मिळावी यासाठी प्रयत्न केला पण आयुक्तांची वेळ आज मिळालेली नाही. उद्या आम्ही महाविकास आघाडीचे पदाधिकारी आयुक्तांशी भेटणार आहोत. सध्या प्रभाग रचने संदर्भात जी चर्चा सुरू आहे ती योग्य नाही. प्रशासनाने सत्ताधाऱ्यांचा दबाव न घेता प्रभाव रचना करावी अशी मागणी करणार आहोत..सकाळ+ चे सदस्य व्हा ब्रेक घ्या, डोकं चालवा, कोडे सोडवा!शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.Read latest Marathi news, Watch Live Streaming on Esakal and Maharashtra News. Breaking news from India, Pune, Mumbai. Get the Politics, Entertainment, Sports, Lifestyle, Jobs, and Education updates. And Live taja batmya on Esakal Mobile App. Download the Esakal Marathi news Channel app for Android and IOS.