

rupali patil
esakal
राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या (शरद पवार गट) प्रवक्त्या आणि आमदार रूपाली पाटील यांनी पक्षशिस्तभंगाच्या नोटिशीला उत्तर देताना पक्ष नेतृत्वालाच उलट सवाल केला आहे. पक्षाच्या संघटन सरचिटणीस संजय खोडके यांनी ७ नोव्हेंबर रोजी पाठवलेल्या नोटिशीमध्ये रूपाली पाटील यांनी राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष आणि प्रदेशाध्यक्ष यांच्याबाबत प्रसारमाध्यमांमध्ये केलेल्या वक्तव्याला पक्षशिस्तभंग करणारे ठरवले होते. त्यावर खुलासा मागवला होता. मात्र, रूपाली पाटील यांनी पाठवलेल्या खुलाशात नोटिशीमध्ये कोणते वक्तव्य शिस्तभंग करणारे आहे, याचा स्पष्ट उल्लेख नसल्याचे म्हटले आहे. यामुळे पक्षांतर्गत वाद चव्हाट्यावर आला असून, रूपाली पाटील यांनी राष्ट्रीय अध्यक्ष अजित पवार यांच्याच मताचा आधार घेऊन स्वतःची बाजू मांडली आहे.